Advertisement

मोटर पंपाची खरेदी इलेक्ट्रिकल्सची संबंध नसलेल्या कंत्राटदाराकडून


मोटर पंपाची खरेदी इलेक्ट्रिकल्सची संबंध नसलेल्या कंत्राटदाराकडून
SHARES

पिसे पांजरापूर संकुलात २८ पंप मोटर्सची खरेदी केली जात असून याबरोबरच ब्लोअर मोटर्सकरता एच.एल.एस.आर सॉफ्ट स्टार्टरचाही पुरवठा करण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, ज्या कंत्राटदाराची यासाठी निवड करण्यात आली आहे, तो कंत्राटदार इलेक्ट्रीक कंत्राटदार नसल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे मुंबईला पाणी पुरवठ्याशी निगडीत बाबींच्या कामांतही महापालिका दक्षता घेत नसल्याचं दिसून येत आहे.



२०२० दशलक्ष लिटर्स पुरवठा

भातसा नदीतून सोडलं जाणारं पाणी पिसे-पांजरापूर येथं अडवून तेथील जलशुध्दीकरणातून जलवाहिनीद्वारे मुंबईला पुरवठा केलं जातं. आतापर्यंत पिसे-पांजरापूर संकुलातील मुंबईला २०२० दशलक्ष लिटर्स पाण्याचा पुरवठा केला जातो. पिसे व पांजरापूर येथील जुने व नवीन पंपिंग स्टेशन व पांजरापूर येथील गाळणी यंत्रे आदींकरता विविध क्षमतेच्या मोटर्स बसवण्यात आल्या आहेत. या मोटर्स डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टिंग पध्दतीवर चालविल्या जात आहे.


वाढतं बिघाडाचं प्रमाण

याशिवाय पिसे-पांजरापूर येथील गाळणी यंत्रांमध्ये एकूण ३ बोअर्स बसवण्यात आल्या आहेत. या बोअर्सचे बेअरींग खराब होतात. त्यामुळे नियमित बिघाड दुरुस्ती व प्रतिबंधात्मक दुरुस्तीचं प्रमाण वाढतं आणि शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होतो. त्यामुळे या मोटर्सचे आयुष्यमान वाढवण्यासाठी व इतर फायदे लक्षात घेता २८ मोटरपंपाबरोबरच एच.एल.एस.आर सॉफ्ट स्टार्टरचाही पुरवठा करण्यासाठी महापालिकेच्यावतीनं कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे.


अटींमध्ये बसणारी कंपनी

यासाठी जयश्री इलेक्ट्रॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे अधिकृत पुरवठार व कंत्राटदार असलेले विरगो स्पेशालिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. परंतु ज्या कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे, तो कंत्राटदार इलेक्ट्रिकल कंत्राटदारच नसून तरीही त्यांना सुमारे सव्वा सहा कोटींचं काम दिलं जात आहे. जलअभियंता अशोककुमार तवाडिया यांच्याशी संपर्क साधला असता, निविदा अटींची पूतर्ता करणारा आणि कमी बोली लावणाऱ्या कंत्राटदाराची निवड केली आहे. निविदा अटींमध्ये ज्या ज्या अटी घालण्यात आल्या होत्या त्या सर्वांची पुतर्ता करणाऱ्या कंत्राटदाराची निवड केली जाते. ती कंपनी इलेक्ट्रिकल्स कंत्राटदार आहे की नाही यापेक्षा निविदा अटींमध्ये ती कंपनी बसते का हेच पाहिलं जातं.



हेही वाचा - 

देशात मुंबई राहण्यासाठी सर्वोत्तम!

पवारांचं डोकं ठिकाणावर आहे का? उद्धव ठाकरे यांचा टोला





संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा