याचाच परिणाम म्हणून शुक्रवार,29 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते 11 पर्यंत मुंबईतील (mumbai) आझाद मैदानात आंदोलन (protest) करण्यात येणार आले.
सीएआयटीचे म्हणणे आहे की, या सर्व ऑनलाईन दिग्गज कंपन्या आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांच्या कायद्यांकडे दुर्लक्ष करून केवळ व्यापक व्यवसाय करत आहेत. तसेच व्यापारी, कर्मचारी आणि कामगारांचे (Traders and employees) शोषणही करत आहेत.
या कंपन्यांवर कठोर कारवाई करावी आणि नियामक आयोग स्थापन करण्याची मागणी आम्ही बऱ्याच दिवसांपासून करत आहोत.
तसेच ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही व्यवसायांसाठी सरकारने एकसमान कायदा करावा, जेणेकरून छोट्या व्यापाऱ्यांवर ऑनलाईन व्यवसायामुळे (online companies) आपला व्यवसाय बंद करण्याची नामुष्की ओढावणार नाही.
या आंदोलनात व्यापारी, ॲमेझॉन वेअरहाऊस कर्मचारी आणि डिलिव्हरी बॉय किंवा स्विगी आणि झोमॅटो सारख्या कंपन्यांचे कामगार यांचाही समावेश होता.गिग वर्कर्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि हॉकर्स जॉइंट ॲक्शन कमिटीचे लक्ष्मण आर्य म्हणाले की, 'या सर्व कंपन्या कोणताही ब्रेक न देता कमी वेतनात कामगारांना सतत दहा तास काम करायला लावत आहेत. तसेच कामगारांना गोदाम किंवा कार्यालयात बसण्यासाठी जागाही उपलब्ध करून दिली जात नाही.
कर्मचाऱ्यांना 11 हजार रुपये पगाराचे मोठे टार्गेट देण्यात आले आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांना शारीरिक व मानसिक यातना सहन कराव्या लागत आहेत.