मुंबई आणि नवी मुंबईसह पश्चिम उपनगर आणि शहराच्या विविध भागांमधून सध्या चाकरमानी गावाची वाट धरतान दिसत आहेत. निमित्त आहे ते म्हणजे येऊ घातलेल्या गणेशोत्सवाचं. अनेक चाकरमानी गावाकडे निघाले आहेत. पण, त्यांची ही वाट मात्र अपेक्षेहून मोठी असणार आहे. कारण, गुरुवारपासूनच मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या संख्येने भाविक जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढली आहे. याच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कोकणात जाणाऱ्या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पर्यायी मार्गांवर काम करा
मंत्री चव्हाण म्हणाले की, गणपतीसाठी कोकणवासीयं मोठ्या संख्येने आपापल्या गावांना भेट देतात. त्यामुळे या काळात या रस्त्यांवर वाहतुकीचे प्रमाण अधिक असते. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने पर्यायी मार्गाचे काम केले आहे, जेणेकरून पर्यायी मार्ग सुकर होईल आणि सहज वापरता येईल.
१९ सप्टेंबरपर्यंत टोलमाफी
याशिवाय या कालावधीत गणेशोत्सवानिमित्त 19 सप्टेंबरपर्यंत टोलमाफी देण्यात आली आहे. या महामार्गावरील 14 ठिकाणच्या पुलांचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही, त्यामुळे या ठिकाणी सेवा रस्त्यांचा वापर करण्यात अडचण निर्माण होत आहे, त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे.
त्याची वेळोवेळी तपासणी केली जात आहे. मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, वाहतूक सुरळीत होण्यासाठी कंत्राटदारांनी दर्जेदार काम केले पाहिजे.
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. वाहतूक कोंडीची ठिकाणे हेरून तिथं विशेष नियोजन करण्यात आलं आहे.
महामार्गावर ठिकठिकाणी तात्पुरते दुभाजक लावण्यात आले आहेत. यंदा प्रथमच पोलीस यंत्रणा ड्रोनचा वापर करणार असल्याचंही म्हटलं जात आहे. दरम्यान या समस्येवर आणखी एक तोडगा म्हणजे महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली आहे शिवाय एसटी बसेसचे थांबे शहराबाहेर करण्यात आले आहेत.
हेही वाचा