Advertisement

होय...आम्हीही तुमच्यापैकीच एक आहोत!


SHARES

भलेही समाज तृतीयपंथीयांना वेगळ्या नजरेतून बघत असला, तरी काळाच्या ओघात तृतीयपंथीयांनी मुख्य धारेत राहून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्याचे कौशल्य आत्मसात केले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने बुधवारी विक्रोळीमध्ये योग साधना करुन तृतीयपंथीयांनी समानतेचा संदेश दिला.


हेही वाचा

21 जूनलाच योग दिन का साजरा करतात?


'किन्नर माँ' सामाजिक संस्थेने विक्रोळी पश्चिमेकडील लिटल फ्लॉवर इंग्लिश हायस्कूलमध्ये योग कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दुपारी 2 वाजेच्या दरम्यान तृतीयपंथीयांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन विविध योगासने केली. संस्थेच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बदलत्या जीवनशैलीमुळे सर्वांना आजाराचा धोका वाढला आहे. त्यामुळे समाजातील सर्व स्तरातील नागरीकांनी योग आवर्जून केला पाहिजे. तृतीयपंथीयांकडे नेहमीच वेगळ्या नजरेने पाहिले जाते. या कार्यक्रमाच्या आयोजनातून तृतीयपंथी देखील समाजाचा महत्त्वाचा भाग आहेत, इतरांप्रमाणे सर्वसामान्य आयुष्य जगण्याचा त्यांचाही हक्क आहे हा संदेश आम्ही दिला. 

- सलमा खान, अध्यक्षा, 'किन्नर माँ' सामाजिक संस्था

तृतीयपंथीयांना समानतेची वागणूक मिळावी यासाठी अनेक सामाजिक संस्था काम करत आहेत. यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्नही केले जात आहेत. काही तृतीयपंथीही ही चौकट मोडून बाहेर पडत आहेत. गौरी सावंत ही त्यापैकीच एक. तिने एका मुलीला दत्तक घेतलं आणि या विषयाला नव्याने तोंड फुटलं. तृतीयपंथीयांच्या प्रश्नांकडे नव्या दृष्टिकोनातून पाहिलं जाऊ लागलं. आधी प्रश्न, मग संशय, मग चर्चा आणि शेवटी स्वीकार अशा प्रवासातून गौरी सावंतचं मातृत्व अखेर समाजानं मान्य केलं. विक्स इंडियाने गौरी सावंतच्या कहाणीवर बनवलेला हा व्हिडिओ सोशव मीडियावर व्हायरल झाला होता.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा