Advertisement

सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादात उंदराची पिल्लं?

मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातील लाडूंच्या शुद्धतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादात उंदराची पिल्लं?
SHARES

मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातील लाडूंच्या शुद्धतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादात उंदरांची पिल्ले आढळली आहेत. त्यानंतर प्रसाद स्वच्छ ठिकाणी ठेवले जात नाहीत आणि तो अशुद्ध आहे, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे भाविकांना वाटप करण्यात आलेल्या महाप्रसादाच्या लाडूच्या पाकिटात उंदराची पिल्ली आढळल्याचा आरोप एका व्हिडिओच्या आधारे लावले जात आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, प्रसादाच्या पाकिटांमध्ये उंदीर दिसत आहेत. याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या सचिव वीणा पाटील यांनी हे मानण्यास नकार दिला आहे की, हे फुटेज मंदिरातील आतील आहे. त्यांनी असेही सांगितले की, व्हायरल फोटो व व्हिडिओ फुटेजची तपासणी केली जाईल.

या मंदिरात दररोज सुमारे 50 हजार लाडू बनवले जातात. प्रसादाच्या एका पाकिटात प्रत्येकी 50 ग्रॅमचे दोन लाडू असतात. सणासुदीच्या काळात प्रसादाची मागणी वाढते. भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यापूर्वी अन्न व औषध विभागाचे अधिकारी नियमितपणे या लाडूंमध्ये वापरण्यात येणाऱ्या घटकांची तपासणी करून ते सर्टिफाइड करतात.



हेही वाचा

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अर्ज केलेल्यांना कधी मिळणार पैसे?

आरे कॉलनीतील गोठ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी दूध उत्पादकांची पालिकेकडे विनंती

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा