मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाच्या बांधकामामुळं मच्छिमारांच्या व्यवसायात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळं आपल्या व्यवसायावर गदा येऊ नये यासाठी मच्छिमार गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. मागील ३० तारखेपासून वरळी कोळीवाड्यातील मच्छिमारांनी कोस्टल रोड विरोधात समुद्रात आपल्या बोटी नेऊन आंदोलन चालू केले. या आंदोलनाची दखल घेवून ११ नोव्हेंबर रोजी मत्स्यव्यवसाय मंत्री व मुंबईचे पालक मंत्री अस्लम शेख यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली व येथील मच्छिमारांशी चर्चा केली.
वरळी येथील कोस्टल रोडचं काम बंद करायला सांगितलं. तसंच, लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या बरोबर बैठक मिटींग लावून तोडगा काढू असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्या अनुषंगाने आधि मुद्दे समजून घेण्यासाठी मंगळवारी दुपारी मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष,आमदार भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राजीव गांधी भवन, आझाद मैदान येथील त्यांच्या कार्यालयात बेठक झाली.
या बैठकीत मुंबई कॉंग्रेस मच्छिमार सेलचे अध्यक्ष धनाजी कोळी, मढ दर्यादीप मच्छिमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष संतोष कोळी, संकेत कोळी तसंच त्यांचे पदाधिकारी व वरळीतील दोन्ही मच्छिमार सोसायटीचे विजय पाटील, जॉन्सन कोळी, नितेश पाटील, रॉयल पाटील, दीपक पाटील, रितेश शिवडीकर यांनसोबत कोस्टल रोडच्या कामकाजात मच्छिमारांना येणाऱ्या अडचणी विषयी सविस्तर चर्चा झाली.
यावेळी भाई जगताप यांनी सांगितलं की, ''मी या विषयावर मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांना सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच इतर संबंधित मंत्री, अधिकारी यांची त्वरित संयुक्त बेठक लावून वरळीतील मच्छिमाराच्या समस्येविषयी योग्य तो मार्ग काढण्याचे सांगितलं. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आत्ताच ऑपरेशन झाले असल्यामुळे मीटिंग साठी वेळ होतोय हे सुद्धा सांगितले . त्याच बरोबर मिटिंग होईपर्यंत कोणतेही समुद्रात कोस्टल रोडचे काम करणार नाहीत असे मच्छिमारांना कळविले असून त्यासंबंधी पालिकेला सुद्धा मिटिंग होईपर्यंत काम न करण्यास सांगतो.''