Advertisement

मुंबईकरांनो लक्ष द्या! मंगळवारी घरातून निघताना जाणून घ्या पावसाचा अंदाज

IMD ने मंगळवारी मुंबईसह ठाणे आणि पालघरसाठी अलर्ट जाहीर केला आहे.

मुंबईकरांनो लक्ष द्या! मंगळवारी घरातून निघताना जाणून घ्या पावसाचा अंदाज
SHARES

मुंबईत पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.  पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  मुंबई आणि रायगडमध्ये अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढचे चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. 

मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यासाठी हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.

तसंच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी ही हवामान खात्याचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सातारा कोल्हापूर परिसरातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला भेट देऊन शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी शहराला हवामान खात्याने येलो अलर्ट दिला असल्याने गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन नागरिकांना केलं आहे.

पावसामुळे कोणते रस्ते बाधित झाले आहेत त्यांची माहिती घेतली, वाहतूक चालू रहावी, ज्या सखल भागात पाणी साचले आहे तिथे पंप लावून पाणी काढून टाकावं, जिथे रेल्वे सेवा बाधित झाली आहे तिथे बेस्ट बसेसची सुविधा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवावी, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.



हेही वाचा

मुसळधार पावसामुळे रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा