भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) २०१९-२० या वर्षासाठी क्रिकेटपटूंसोबतचे करार जाहीर केले आहेत. ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी क्रिकेटपटूंना देण्यात येणारे मानधन बीसीसीआयने जाहीर केले. या करारानुसार यंदा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, हिटमॅन रोहित शर्मा व जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना लॉटरी लागली आहे.
क्रिकेटपटूंना देण्यात येणाऱ्या मानधनाचे ग्रेड 'A+', ‘A', 'B' आणि 'C' असे ४ प्रकार करण्यात आले आहेत. 'ए प्लस'मध्ये असलेल्या क्रिकेटपटूंना ७ कोटी, 'ए' ग्रेटमधील खेळाडूंना ५ कोटी, 'बी' ग्रेटमधील खेळाडूंना ३ कोटी तर अखेरच्या 'ग्रेड सी'मधील खेळाडूंना १ कोटी मानधन दिलं जाणार आहे.
The BCCI announces the Annual Player Contracts for Team India (Senior Men) for the period from October 2019 to September 2020.
— BCCI (@BCCI) 16 January 2020
Saini, Mayank, Shreyas, Washington and Deepak Chahar get annual player contracts.
More details here - https://t.co/84iIn1vs9B #TeamIndia pic.twitter.com/S6ZPq7FBt1
'ग्रेड ए प्लस' : विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह.
'ए
ग्रेड'
: आर.अश्विन,
रविंद्र
जडेजा,
भुवनेश्वर
कुमार,
चेतेश्वर
पुजारा,
अजिंक्य
रहाणे,
केएल
राहुल,
शिखर
धवन,
मोहम्मद
शमी,
इशांत
शर्मा,
कुलदीप
यादव,
ऋषभ
पंत.
'बी ग्रेड' : वृद्धीमान सहा, उमेश यादव, यजुवेंद्र चहल, हार्दिक पंड्या, मयांक अग्रवाल.
'ग्रेड सी' : केदार जाधव, नवदीप सैनी, दीपक चहर, मनिष पंड्या, हनुमान विहारी, शादुर ठाकूर, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर.