Advertisement

अांतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेवर रिझवी काॅलेजचा दुसऱ्यांदा कब्जा


अांतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेवर रिझवी काॅलेजचा दुसऱ्यांदा कब्जा
SHARES

रिझवी काॅलेजने अाठव्या साकिब रिझवी स्मृती चषक अांतर-महाविद्यालयीन फिरता चषक क्रिकेट स्पर्धेवर वर्चस्व गाजवत सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदाचा मान पटकावला. ज्युनियर काॅलेज स्पोर्टस असोसिएशन अाॅफ मुंबई अाणि मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) यांच्या मान्यतेने झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रिझवी काॅलेजने पहिल्या डावातील अाघाडीच्या बळावर ठाकूर काॅलेजचा पराभव करून फिरता चषक मिळवला.


पहिल्या डावात अाघाडी

प्रथम फलंदाजी करताना रिझवी काॅलेजचा डाव मात्र १३८ धावांवर गडगडला. फरकुअान चारोलिया याने पाच तर सुवेद पारकरने चार विकेट्स मिळवत ठाकूर काॅलेजला फ्रंटफूटवर अाणले. त्यानंतर रिझवीच्या गोलंदाजांनीही सुरेख कामगिरी करत ठाकूर काॅलेजचा डाव ६६ धावांवर संपुष्टात अाणत पहिल्या डावात ७२ धावांची भक्कम अाघाडी घेतली. रिझवीकडून पार्थ राय, अथर्व अंकोलकरने प्रत्येकी तीन तर विघ्नेश सोलंकीने चार विकेट्स मिळवल्या.


दुसऱ्या डावात रिझवीचे वर्चस्व

दुसऱ्या डावात रिझवी काॅलेजच्या फलंदाजांनी पूर्णपणे वर्चस्व गाजवले. अार्यन बांगर याने शानदार ११६ धावांची खेळी करत रिझवीला ७ बाद ३१३ धावा उभारून दिल्या. रिझवीसाठी हर्षित जानवडेकर (६६) यानेही अर्धशतक झळकावत महत्त्वपूर्ण योगदान दिले. विजयासाठी ३८६ धावांचे अाव्हान पार करताना ठाकूर काॅलेजने रिझवी काॅलेजला विजय बहाल केला.


हेही वाचा -

साकिब रिझवी अांतर-महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा शुक्रवारपासून

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा