Advertisement

मुंबईतील पंचांच्या आर्थिक मदतीसाठी माजी पंचांचा मदतीचा हात

दरवर्षी मुंबईत एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये सर्वाधिक स्थानिक क्रिकेट समाने खेळले जातात.

मुंबईतील पंचांच्या आर्थिक मदतीसाठी माजी पंचांचा मदतीचा हात
SHARES

दरवर्षी मुंबईत एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये सर्वाधिक स्थानिक क्रिकेट समाने खेळले जातात. परंतु, यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील स्थानिक क्रिकेट पूर्णपणे थांबले आहे. त्याचा फटका दररोज होणाऱ्या सामन्यांमध्ये पंचगिरी करून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असणाऱ्या गुणलेखक आणि पंचांना बसत आहे. त्यामुळं या गरजू मंडळींच्या मदतीसाठी मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) माजी पंचांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

‘एमसीए’चे माजी कार्यकारिणी सदस्य आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी पंच गणेश अय्यर यांनी पंचांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. माजी पंचांकडून निधी गोळा करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. स्थानिक पंच आणि गुणलेखक यांचा रोजगार मुंबईत होणाऱ्या स्थानिक क्रिकेट सामन्यांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. त्यांना माजी पंचांनी आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांना दिली आहे.

गुणलेखकाला प्रत्येक सामन्याचे दिवसाला १५०० रुपये मिळतात आणि पंचांना प्रत्येक सामन्याचे दिवसाला २००० रुपये मिळतात. आतापर्यंत अडीच लाख रुपयांची मदत जमा करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. एमसीएच्या माजी पंचांनी स्वेच्छेने आर्थिक मदत करावी, असं आवाहन करण्यात आलं होतं. स्थानिक सामन्यांवर ज्या गुणलेखक आणि पंचांचा रोजगार अवलंबून आहे त्यांची यादी आमच्याकडे आहे. ४७ पंच आणि १५ गुणलेखक अशा एकूण ६२ जणांना प्रत्येकी ३००० रुपये सुरुवातीला दिले आहेत. त्यांच्या बँक खात्यांत हे पैसे जमा करण्यात आल्याची माहिती मिळते.



हेही वाचा -

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अमृतांजन पूल पाडण्यात येणार

९वी व ११वीच्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश?



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा