Advertisement

आॅस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या T20 साठी भारतीय संघाची निवड

आॅस्ट्रेलिया आणि भारतात ब्रिस्बेनमध्ये पहिला टी २० सामना खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघाचं कप्तानपद पुन्हा एकदा विराट कोहली भूषवणार असून तडाखेबंद फलंदाज अॅराेन फिंच कांगारूचं नेतृत्व करेल.

आॅस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या T20 साठी भारतीय संघाची निवड
SHARES

भारतीय क्रिकेट संघ बुधवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या टी २० सामन्यापासून आॅस्ट्रेलिया दौऱ्याला सुरूवात करेल. आॅस्ट्रेलिया आणि भारतात ब्रिस्बेनमध्ये पहिला टी २० सामना खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघाचं कप्तानपद पुन्हा एकदा विराट कोहली भूषवणार असून तडाखेबंद फलंदाज अॅराेन फिंच कांगारूचं नेतृत्व करेल. बुधवारी होणाऱ्या सामन्यासाठी बीसीसीआयने १२ खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे.


अंतिम ११ मध्ये कोण?

पहिल्या टी २० साठी भारतीय संघात मनिष पांडे आणि वाॅशिंग्टन सुंदरची वर्णी लागू शकली नसली, तरी के. एल. राहुलला आणखी एक संधी देण्यात आली आहे. यष्टीरक्षणाची जबाबदारी ऋषभ पंतकडे सोपवण्यात आली आहे. तर अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिकला फलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात आलं आहे. त्याचसोबत संघात २ फिरकीपटू आणि ३ जलदगती गोलंदाज निवडण्यात आले आहेत. त्यामुळे अंतिम ११ मध्ये के. एल. राहुल किंवा कार्तिकला संधी मिळेल की भारतीय संघ ५ गोलंदाजांसह मैदानात उतरेल हे बुधवारीच कळेल.


'असा' आहे भारतीय संघ:

विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, के.एल राहुल, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद आणि चहल



हेही वाचा-

मीडिया, चाहत्यांशी नम्रतेने वाग! विराटला बीसीसीआयची समज

मुंबईकर अरमानने झळकावलं दुसरं तिहेरी शतक



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा