क्रिकेट अाणि बाॅलीवूडमधील दिग्गजांच्या अफेअर्सची नेहमीच चर्चा रंगत असते. अलीकडेच भारताचा कर्णधार विराट कोहली अाणि अनुष्का शर्मा यांचं प्रकरणही चांगलंच गाजलं होतं. अाता भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री अाणि बाॅलीवूडची अभिनेत्री निमरत कौर यांच्या अफेअरची चर्चा सध्या रंगली अाहे. २०१५ मध्ये एका कार लाँचिंग सोहळ्यात ते पहिल्यांदा एकमेकांना भेटले, त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जातंय.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रवी शास्त्री अाणि रितू सिंह यांनी १९९० मध्ये अापल्या सुखी संसाराला सुरुवात केली होती. तब्बल २२ वर्षे एकमेकांसोबत संसार थाटल्यानंतरही या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. मात्र २२ वर्षांनंतर ते विभक्त झाले अाहेत. रवी अाणि रितू यांना अलेका नावाची मुलगीसुद्धा अाहे.
२०१५ मध्ये एका जर्मन कारच्या लाँचिंग सोहळ्यात रवी शास्त्रींची अोळख 'एअरलिफ्ट’ फेम निमरत कौर हिच्याशी सुरू झाली. एकत्र भेटणे, गाठीभेटी वाढल्या. दोघांमध्ये अफेअर सुरू झाल्याची कोणालाही खबर नव्हती. पण अाता या दोघांमधील नाते सर्वांसमोर अाले अाहे. मात्र दोघांपैकी एकानेही या नात्याला दुजोरा दिलेला नाही. रवी शास्त्री सध्या टीम इंडियासोबत इंग्लंड दौऱ्यावर अाहेत. लंच बाॅक्स, एअरलिफ्टमध्ये दिसलेली निमरत कौर सध्या एका वेबसिरीजमध्ये बिझी अाहे.
हेही वाचा -
युवा बुद्धिबळपटू सुहानीची केरळवासीयांना मदत
भारत-वेस्ट इंडिज चौथी वनडे २९ अाॅक्टोबरला मुंबईत