भारताचा क्रिकेटपटू पार्थिव पटेलनं सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पार्थिव पटेलनं जेव्हा भारतीय संघाकडून कसोटीत पदार्पण केलं होतं, तेव्हा तो सर्वात कमी वयाचा विकेटकिपर होता. त्याने १७ वर्ष आणि १५३व्या दिवशी पदार्पण केलं होतं. देशांतर्गत क्रिकेटमध्ये पार्थिव गुजरातकडून खेळत होता. भारतीय संघात संधी मिळण्याचे पार्थिव पटेलनं अनेकदा प्रयत्न केले. पण त्याला यश आलं नाही. त्यानंतर तो आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेट खेळू लागला. २०१५च्या आयपीएलमध्ये त्याने ३३९ धावा केल्या होत्या. तेव्हा मुंबई संघाकडून त्याने सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याच वर्षी मुंबई संघाने आयपीएलचे विजेतेपद देखील मिळवले होते.
विजय हजारे ट्रॉफीत त्याने शतक झळकावलं होतं आणि गुजरातला विजेतेपद मिळून दिलं होतं. पार्थिवने फेब्रुवारी २०१६ मध्ये अखेरची आंतरराष्ट्रीय मॅच खेळली होती. तेव्हा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात वृद्धीमान सहाला दुखापत झाली होती म्हणून पार्थिवला संघात स्थान मिळालं होतं. पार्थिव पटेलनं त्या सामन्यात ५४ चेंडूत नाबाद ६४ धावा केल्या होत्या. त्यामुळं भारतीय संघानं विजय मिळवला होता.
भारताचा कर्णधार आणि विकेटकीपर एम एस धोनीसह सचिन तेंडुलकर आणि जहीर खान यांना वेस्ट इंडिज दौऱ्यात विश्रांती दिली होती. तेव्हा वृद्धीमान साहा सोबत पार्थिव पटेलला भारतीय संघात संधी देण्यात आली होती. तेव्हा त्यानं आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पदार्पण केलं होतं.
— parthiv patel (@parthiv9) December 9, 2020
या एकमेव सामन्यात पार्थिव पटेलनं २० चेंडूत २६ धावा (२ चौकार आणि १ षटकार) केल्या होत्या. तर दुसऱ्या वनडे सामन्यात नाबाद ५६ धावा केल्या होत्या. नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामात तो रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघात होता. पण त्याला अंतिम ११ मध्ये संधी मिळाली नाही.
पार्थिव पटेलची कारकिर्द