आयपीएलच्या १४ व्या हंगामात कोरोनाने शिरकाव केला आहे. कोलकाता नाइट रायडर्सच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण आहे. त्यामुळे सोमवारी 3 मे रोजी होणारी कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यातील लढत पुढे ढकलण्यात आली आहे. हा सामना संध्याकाळी ७ वाजता अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार होती.
आयपीएल सामन्यांची सुरूवात ९ एप्रिल रोजी झाली होती. आयपीएल सुरू होण्याआधी काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला करोनाची लागण झाली होती. पण बायो बबलमध्ये कोणालाही कोरोना झाला नव्हता. आता स्पर्धा सुरू असताना प्रथमच बायो बबलमधील खेळाडूंना कोरोना झाला आहे. कोलकात्याच्या संघातील फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर्स यांना कोरोनाची लागण झाल्याने हा सामना पुढे ढकलण्यात आला आहे.
त्यामुळे सोमवारी होणारी लढत पुढे ढकलण्यात आली आहे. या सामन्याची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचीव अनिल पटेल यांनी सांगितले.
हेही वाचा -