भारतीय संघात निवड करण्यात आलेल्या मुंबईच्या श्रेयस अय्यरने चमकदार कामगिरी करत तामिळनाडू विरुद्धच्या रणजी सामन्यात मुंबई संघातील श्रेयसने सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डसोबत आपली बरोबरी केली आहे. 22 वर्षीय श्रेयस भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी आधीपासूनच प्रयत्न करत होता. आता त्याची न्यूझीलंडसोबत होणाऱ्या टी 20 मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे.
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या तामिळनाडू विरुद्ध मुंबई संघातील रणजी ट्रॉफीच्या ग्रुप सी मध्ये श्रेयसने शानदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. या सामन्यात अय्यरने 124 चेंडूत 138 धावा करत सुंदर अशी कामगिरी केली. यावेळी त्याने 9 षटकार लगावत आपला दबदबा कायम राखला. या शानदार कामगिरीसोबतच त्याने सचिनच्या रेकॉर्डशी आपली बरोबरी केली. रणजीच्या इतिहासात सार्वधिक षटकार लगवण्याचा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावे होता. आता श्रेयसही त्याच्या बरोबरीत आला आहे.
सचिनने 1996 मध्ये रणजी सामन्यात 9 षटकार लगावत एक विक्रम केला होता. सचिनसोबतच मुंबईकडून अजून एक सार्वधिक षटकार ठोकणारा विक्रम सध्याचे भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या नावावर आहे. त्यांनी 1985 मध्ये बडोदा विरुद्ध झालेल्या सामन्यात 123 चेंडूत नाबाद 200 धावा करून तब्बल 13 षटकार लगावले होते.