Advertisement

मुंबईच्या मुख्य प्रशिक्षकासाठी अोमकार साळवीची शिफारस


मुंबईच्या मुख्य प्रशिक्षकासाठी अोमकार साळवीची शिफारस
SHARES

भारताचे माजी यष्टीरक्षक समीर दिघे यांनी मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर अाता प्रशिक्षकाच्या नियुक्तीसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशननं (एमसीए) पावलं उचलली अाहेत. मुंबई संघातील अव्वल क्रिकेटपटूंनी गेल्या चार वर्षांपासून मुंबईच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची धुरा सांभाळणारे अोमकार साळवी यांची मुंबईच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी शिफारस केली अाहे. विशेष म्हणजे, भारताचा माजी वेगवान गोलंदाज अाविष्कार साळवीचा मोठा भाऊ असलेल्या अोमकार यांनी कधीही मुंबईचे प्रतिनिधित्व केलेले नाही.


बैठकीला सहा खेळाडू उपस्थित

एमसीएचे सचिव उन्मेष खानविलकर यांनी मुंबई क्रिकेटच्या भवितव्याविषयी चर्चा करण्यासाठी सहा खेळाडूंना बैठकीसाठी बोलावलं होतं. त्यात कर्णधार अादित्य तरे, सूर्यकुमार यादव, अभिषेक नायर, धवल कुलकर्णी अाणि शार्दूल ठाकूर यांचा समावेश होता. या बैठकीत खेळाडूंनी अोमकार साळवीच्या नावाची शिफारस केली अाहे.


मुंबईचे प्रशिक्षक, फिजियो अाणि ट्रेनर यांच्या नियुक्तीविषयी अामची मते जाणून घेण्यात अाली. ट्रेनर अाणि फिजियोच्या निवडीसाठी नॅशनल क्रिकेट अकादमीशी (एनसीए) सल्लामसलत करण्याचे अाम्ही खानविलकर यांना सुचवले अाहे. सर्व खेळाडूंनी साळवीच्या नावाला पसंती दर्शवली. प्रवीण अमरे, चंद्रकांत पंडित अाणि समीर दिघे या मुंबईच्या अाधीच्या तीन प्रशिक्षकांपेक्षा अोमकारचा अनुभव दांडगा अाहे. तो नसल्यास, अमरे किंवा अभिषेक नायरला अामची पसंती अाहे.
- मुंबईचे रणजी खेळाडू


अंतिम निर्णय सुधार समितीकडे

सध्या मुंबईच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी प्रवीण अमरे, चंद्रकांत पंडित, सुलक्षण कुलकर्णी यांच्यासारखे माजी खेळाडू शर्यतीत असले तरी अंतिम निर्णय हा अजित अागरकरच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सुधार समिती घेणार अाहे.


हेही वाचा -

समीर दिघेंचा मुंबईच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा

मुंबई क्रिकेटमध्येही सुरू होणार यो-यो टेस्ट?



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा