Advertisement

'आयपीएल'चा उद्धाटन सोहळा रद्द, शहीद जवानांना मदत

इंडियन प्रिमीअर लीगचा (आयपीएल) उद्घाटन सोहळा यंदा रद्द करण्यात आला आहे. गेल्या गुरुवारी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा उदघाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे.

'आयपीएल'चा उद्धाटन सोहळा रद्द, शहीद जवानांना मदत
SHARES

दरवर्षी मोठ्या दिमाखात पार पडणारा इंडियन प्रिमीअर लीगचा (आयपीएल) उद्घाटन सोहळा यंदा रद्द करण्यात आला आहे. गेल्या गुरुवारी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा उदघाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी लागणारी रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार आहेअशी माहिती बीसीसीआय प्रशासकीय समितीचे सदस्य विनोद राय यांनी दिली आहे.


जवानांच्या कुटुंबीयांना मदतनिधी

गुरुवारी झालेल्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले अाहेत. त्यामुळं आयपीएच्या उद्घाटन सोहळ्याकरिता येणारा सर्व खर्च पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदतनिधी म्हणून देण्यात येणार आहे,  असं विनोद राय यांनी सांगितले.


वेळापत्रक जाहीर

यंदा आयपीएलचे हे बारावे पर्व असून, २३ मार्चपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तसंच, आयपीएलच्या पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक देखील नुकताच जाहीर करण्यात आले. आयपीएलमधील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु यांच्यात होणार आहे.



हेही वाचा -

Movie Review : मनी, पॅावर आणि माईंडगेमचा गूढ प्रवास

'मॅजिक मिक्स'मुळे बेस्टचे ५००० कर्मचारी तंबाखूमुक्त



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा