जगातील क्रिकेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या अांतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (अायसीसी) अध्यक्षपदी मराठी माणूस दुसऱ्यांदा विराजमान झाला अाहे. नागपूरच्या चित्पावन ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले अाणि मराठी असलेले शशांक मनोहर यांची अायसीसीच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात अाली अाहे. अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत मनोहर हे एकमेव उमेदवार होते. अाता पुढील दोन वर्षे ते जगातील क्रिकेटची सूत्रे अापल्या हाती घेतील. बीसीसीअायचे माजी अध्यक्ष असलेले मनोहर हे २०१६ मध्ये अायसीसीचे पहिले स्वतंत्र चेअरमन ठरले होते.
अायसीसीच्या निवडणूक प्रक्रियेनुसार, देशातील सर्वोच्च संघटनेवर असलेल्या संचालकांना अायसीसीचा विद्यमान अथवा माजी संचालक असलेल्या एका उमेदवाराची शिफारस करण्याची परवानगी होती. दोन किंवा अधिक संचालकांचा पाठिंबा असलेला उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी पात्र ठरणार होता. मनोहर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज अाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात अाली.
अायसीसीच्या अध्यक्षपदी पुन्हा निवडून अाल्याचा अभिमान वाटत असून अायसीसी संचालक असलेल्या माझ्या सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचे अाभार मानतो. २०१६ मध्ये दिलेली अाश्वासने मी पुढील दोन वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. खेळाच्या प्रसारासाठी अाता जागतिक धोरण ठरविण्यात येईल.
- शशांक मनोहर, अायसीसीचे अध्यक्ष
मराठा चित्पावन ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले शशांक मनोहर हे पेशाने वकील अाहेत. त्यांचे अाजोबा, वडील, भाऊ, बहीण, मुलगा हे सर्व वकील अाहेत. शशांक मनोहर यांनी अनेक प्रकरणं हाताळली असून भारतीय कायद्यावर अनेक पुस्तकेही लिहिली अाहेत. त्यांनी दोन वेळा बीसीसीअायचं अध्यक्षपद भूषवलं अाहे. नोव्हेंबर २०१७ ते मार्च २०१७ मध्ये ते अायसीसीच्या अध्यक्षपदी विराजमान होते.
हेही वाचा -
अायपीएलमुळे बीसीसीअायची झाली 'इतकी' कमाई
अबब! टीम इंडियाच्या एका सामन्यासाठी स्टार स्पोर्टस मोजणार ६० कोटी