Advertisement

कनिका कपूरमुळे क्रिकेट टिम क्वारंटाईन

ज्या हॉटेलमध्ये कनिका स्थायिक होती, तिथेच क्रिकेट संघही होता. त्यामुळे त्यांना आता क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं आहे

कनिका कपूरमुळे क्रिकेट टिम क्वारंटाईन
SHARES

साऱ्या जगात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. कोरोनाचा धोका दिवसेंदिवस भारतातही वाढत आहे. फक्त सामान्यांना नाही तर बॉलिवूड आणि क्रीडा विश्वालाही याचा फटका बसला आहे. यातच बॉलिवूड गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. एका पार्टीत कनिका उपस्थित असल्यामुळे तिच्यावर कारवाईही करण्यात आली होती. पण आता दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ कनिकामुळे अडचणीत आला आहे.    

लखनऊमध्ये एका पार्टीमध्ये कनिका उपस्थित होती. अनेक राजकीय नेते मंडळीही या पार्टीत सामिल झाले होते. पण ज्या हॉटेलमध्ये कनिका स्थायिक होती, तिथेच आफ्रिकेचा संघही होता. त्यामुळे त्यांना आता दुसऱ्यांदा क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं आहे. याआधी भारत-दक्षिण आफ्रिका दौरा रद्द झाल्यानंतर मायदेशी परतलेल्या खेळाडूंना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं होतं. आता कनिका कपूरमुळे दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची चिंता वाढली आहे.

दरम्यान बॉलिवूड गायिका कनिका कपूरची कोरोनाची दुसरी चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे. सोमवारी ही चाचणी करण्यात आली होती. संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये ही चाचणी करण्यात आली.

कनिकाची तब्येत स्थिर असून ती नक्की कोणाकोणाला भेटलेली याची पोलीस चौकशी करत आहेत. रिपोर्टनुसार, कनिका लंडनहून परतल्यानंतर तीन पार्ट्यांना गेली होती. यावेळी ती जवळपास १६० लोकांच्या संपर्कात आली.

याआधी कनिकाविरुद्ध बेजबाबदार असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. कोरोना पॉझिटिव्ह असतानाही बेजबाबदारपणे वागत पार्ट्यांना गेल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. तिला घरातच आयसोलेट होण्याचा सल्ला देण्यात आला होता. पण तिनं नियमांना धाब्यावर बसवत पार्ट्या केल्या. यामुळेच तिच्यावर कलम १८८, २६९ आणि २७० लावण्यात आले आहेत.

कनिकाने गेल्या आठवड्यात लखनऊमध्ये गेल्यानंतर ताज हॉटेलमध्ये पार्टी दिली होती. याशिवाय ती अन्य दोन पार्ट्यांनाही गेली हाती. लखनऊमध्ये गेल्यानंतर गेल्या सात दिवसांमध्ये ती जिथे गेली त्या सर्व जागा जिल्हाधिकाऱ्यांनी बंद करण्याचे आदेश दिले आहेत



हेही वाचा

परिस्थिती नियंत्रणात आल्यास होणार IPL, अन्यथा रद्द?

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा