Advertisement

सुनील गावस्कर यांची एमसीएच्या टी-२० मुंबई लीगचे कमिशनर म्हणून नियुक्ती


सुनील गावस्कर यांची एमसीएच्या टी-२० मुंबई लीगचे कमिशनर म्हणून नियुक्ती
SHARES

मुंबईची शान अाणि महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांची टी-२० मुंबई लीगचे कमिशनर म्हणून नियुक्ती करण्यात अाली अाहे. ११ ते २१ मार्चदरम्यान वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या या स्पर्धेसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) कंबर कसली असून सचिन तेंडुलकर (ब्रँड अॅम्बेसेडर) नंतर अाता सुनील गावस्कर या मुंबईच्या दोन महान खेळाडूंची नावे या टी-२० लीगशी जोडली गेली अाहेत.


गावस्कर यांचा अल्प परिचय

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 'सनी’ म्हणून अोळखले जाणारे सुनील गावस्कर म्हणजे मुंबईचे वैभव. अापल्या कारकीर्दीत गावस्कर यांनी सर्वाधिक कसोटी धावा अाणि सर्वाधिक कसोटी शतके असे अनेक विश्वविक्रम त्याकाळी रचले होते. त्यांनी रचलेला सर्वाधिक ३४ कसोटी शतकांचा विक्रम दोन दशके अबाधित होता. पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात अालेल्या गावस्कर हे कसोटीत १० हजार धावा करणारे पहिले फलंदाज ठरले होते.


लीगविषयी काय म्हणाले गावस्कर?

टी-२० मुंबई लीग ही मुंबईच्या क्रिकेटच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घडामोड ठरणार अाहे. पदार्पणाच्या मोसमातच या लीगचा एक भाग बनणे, ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब अाहे. मुंबईत गुणवान क्रिकेटपटूंची मोठी फळी अाहे, या लीगमुळे त्यांना अापले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी एक चांगले व्यासपीठ मिळेल.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा