Advertisement

विराट कोहलीने मोडला आयसीसीचा 'तो' नियम

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यानं दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्धच्या सामन्यात मोठी चूक केली आहे.

विराट कोहलीने मोडला आयसीसीचा 'तो' नियम
SHARES

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यानं दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्धच्या सामन्यात मोठी चूक केली आहे. विराट कोहलीनं चेंडूला लाळ लावली. यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कोविड-१९ नियमांचं उल्लंघन झालं.

दुबईत इंटरनॅशनल स्टेडिअममध्ये दिल्ली विरुद्ध सामना खेळत असताना कोहलीनं शॉर्ट कवरवर फिल्डींग करताना आपल्याकड येणारा बॉल अडवला. त्यानंतर त्या चेंडूवर लाळ लावली. मात्र, कोहलीला लगेचच आपली चूक लक्षात आली. त्यानंतर कोहलीनं हात वर करत आपली चूक मान्य केली.

या संपूर्ण सामन्यावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एक ट्विट केलं. 'पृथ्वी शॉनं काय अविश्वसनीय शॉट मारला. तर चेंडूवर लाळ लावल्यावर कोहलीची रिऍक्शन देखील पाहण्यासारखी होती. कधी कधी काही गोष्टी सवयीनुसार घडतात', असं सचिन तेंडुलकरने ट्विटमध्ये म्हटलं.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा