ठाणे (thane) जिल्ह्यातील अंबरनाथ (ambernath) (पश्चिम) येथील एका इमारतीच्या तळमजल्यावरील डक्ट परिसरात गुरुवारी, 21 नोव्हेंबर रोजी सकाळी नवजात बालिकेचा (newborn baby) मृतदेह आढळून आला. हे अर्भक अवघ्या एक दिवसाचे होते, अशी माहिती स्थानिक डॉक्टरांनी दिली आहे.
काही वेळातच शंकर हाईट्समधील रहिवाशांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली, त्यांनी या घटनेचा तपास सुरू केला. याप्रकरणी एका महिला रहिवाशाची चौकशी करण्यात आली आहे.
पोलीस अधिकारी तातडीने पोहोचले आणि अर्भकाचा मृतदेह (death) शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.
सोसायटीतील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, त्या भागातील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित नाहीत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी सांगितले की, रात्रीच्या वेळी अविवाहित आईच्या पोटी बाळाचा जन्म झाला असावा, असे प्राथमिक निष्कर्षावरून दिसून येत आहे.
तपासात मदत करण्यासाठी, नुकत्याच झालेल्या प्रसूतींच्या जवळच्या रुग्णालयांमधील नोंदींचे पोलीस पुनरावलोकन करत आहेत आणि पालक असल्याचा संशय असलेल्या व्यक्तींच्या डीएनए (DNA) चाचण्या घेत आहेत. इमारतीतील दोन महिला भाडेकरूंना चौकशीसाठी आणण्यात आले मात्र नंतर त्यांना सोडून देण्यात आले.
मृत्यूच्या कारणाबाबत रुग्णालयाच्या प्राथमिक अहवालाची वाट पाहत असल्याचे निरीक्षक बालाजी पांढरे यांनी सांगितले. हे एक गंभीर आणि संवेदनशील प्रकरण आहे आणि ते अर्भकाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहेत.
हेही वाचा