कमला मिल आग: 'वन अबोव्ह'च्या २ मॅनेजरला अटक


कमला मिल आग: 'वन अबोव्ह'च्या २ मॅनेजरला अटक
SHARES

लोअर परळच्या कमला मिल कंपाऊंडमधील वन अबोव्ह या पबला लागलेल्या आगीप्रकरणी ना. म. जोशी माग पोलिसांनी रविवारी रात्री पबच्या दोन मॅनेजरला अटक केली आहे. केव्हीन बावा आणि लिसबोन लोपेस  अशी या दोघांची नावं असल्याचं सांगण्यात आलं आहे. या दोघांना सोमवारी भोईवाडा न्यायालयात हजर केलं असता दोन्ही आरोपींना ९ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.



कमला मिल कंपाऊडमधील मुख्य आरोपी ऱ्हेतेश संघवी जिगर संघवी आणि अभिषेक मानका यांना अटक करण्यात पोलिसांना अपयश येत असताना. पोलिसांनी या गुन्ह्यांशी निघडीत जबाबदार व्यक्तींना अटक करण्यास सुरूवात केली आहे. आग लागल्याची माहिती कळताच त्या ठिकाणाहून पहिल्यांदा पबचे कर्मचारी पळून गेल्याचं म्हटलं जात होतं. त्यामध्ये अटक आरोपी केव्हिन आणि लोपेस या दोघांचाही समावेश होता. 

पबमध्ये सुरू असलेल्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी या दोघांवर असल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे. या घटनेनंतर हे दोघीही आरोपी फरार झाले होते. या दोघांची माहिती मिळाल्यानंतर मुंबईबाहेर पळण्याच्या तयारीत असलेल्या या दोघांना पोलिसांनी रविवारी मध्यरात्री ११ वाजेच्या सुमारास ताब्यात घेतलं. या दोघांच्या चौकशीत गुन्ह्यांत त्यांचा सहभाग आढळ्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त दिपक देवराज यांनी दिली.


आरोप चुकीचे-

आग लागली त्यावेळी दोन्ही आरोपी कुठेही पळून गेले नव्हते. उलट ते लोकांना बाहेर काढण्यासाठी धावपळ करत होते. घटलेली घटना ही दुर्दैवी आहेच. मात्र तो एक अपघात आहे. तसेच दोन्ही आरोपी त्या ठिकाणी नोकरी करतात. त्यामुळे त्यांचा या अपघातात काही हात नसताना त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आल्याचं आरोपींचे वकील विजय ठाकूर यांनी सांगितलं.

फरार नातेवाईकाला अटक, जामीनावर मुक्तता
कमला मिल मधील मुख्य आरोपी ऱ्हेतेश संघवी, जिगर संघवी आणि अभिषेश मानपा यांना फरार होण्यास मदत केल्याप्रकरणी भायखळा पोलिसांनी शनिवारी रात्री महेंद्रकुमार, राकेश आणि आदीत्य संघवी यांच्यावर गुन्हा नोंदवला होता. हे तिघेही जण संघवी बंधूचे चुलते आहेत. या तिघांनी सरकारी कामात अडथळा आणत आरोपींना पळून जाण्यात मदत केल्याचा आरोप पोलिसांनी त्यांच्यावर केला आहे. त्यानुसार पोलिसांनी या पूर्वी राकेश आणि आदीत्य यांना अटक केली होती. मात्र न्यायालयाने त्यांची जामीनावर मुक्तता केली. मात्र या गुन्ह्यांतील महेंद्रकुमार हे फऱार होते. रविवारी रात्री भायखळा पोलिसांनी महेंद्र यांना अटक करत त्यांना शिवडी न्यायालयात हजर केलं असता. न्यायालयाने त्यांची जामीनावर मुक्तता केल्याची माहिती भायखळा वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिंगटे यांनी दिली.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा