उल्हासनगरमध्ये एका कापड व्यापाऱ्याची डोक्यात धोपाटणं मारून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रकाश कासानी (५४) असं या कापड व्यापाऱ्याचं नाव आहे. याप्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला असून हत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश कासानी हे उल्हासनगरमधील हरी ओम अपार्टमेंट या इमारतीमध्ये राहत होते. बुधवारी रात्री १२.०६ वाजेच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीनं प्रकाश याच्या घरात घूसून त्यांच्या डोक्यात धोपाटणं मारून त्यांची हत्या केली.
त्यानंतर हल्लोखाराने त्वरीत घटनास्थळावरून पळ काढला. प्रकाश यांच्यावर हल्ला करणारा आरोपी अद्याप फरार असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हेही वाचा-
लोकलखाली उडी मारून महिलेची आत्महत्या
वृद्धांना फसवणाऱ्या तोतया पोलिसाला अटक