मुंबई-अहमदाबाद पश्चिम द्रुतगती महामार्गावर गुरूवारी सकाळी एका भरधाव ट्रेलरने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रेलरच्या चाकाखाली येऊन दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
पालघर जिल्ह्यातील चारोटी उड्डाणपुलाखालून हा ट्रेलर भरधाव वेगाने जात होता. त्याचवेळेस समोरुन आलेल्या दुचाकीला या ट्रेलरने जोरदार धडक दिली. या धडकेने दुचाकीस्वार खाली पडला आणि दुर्दैवाने ट्रेलरच्या चाकाखाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत दुचाकीस्वाराची ओळख अद्याप पटली नसून पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.