अभिनेत्री दिप्ती भटनागरची दीड कोटीची फसवणूक


अभिनेत्री दिप्ती भटनागरची दीड कोटीची फसवणूक
SHARES

स्वामित्त्व हक्क उल्लघंन करून दीड कोटी रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी अभिनेत्री दिप्ती भटनागरने तेलगु वाहिनीविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली  आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अभिनेत्रीचा यात्रा कार्यक्रम आरोपी वाहिनीने कोणतीही परवानगी न घेता दाखवण्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे.

हेही वाचाः- देशात 'इतक्या' जणांना लसीचे साइड इफेक्ट

तक्रारदार अभिनेत्रीचे अंधेरीत दिप्ती भटनागर प्रोडक्शन नावाने कंपनी आहे. त्याच्या माध्यमातून यात्रा या सुप्रसिद्ध मालिकेची निर्मिती करण्यात आली होती. २००१ मध्ये ही मालिका स्टार टीव्हीवर दाखवण्यात यायची. तक्रारीनुसार, मार्च २००३ मध्ये स्टारने मालिकेवरील सर्व हक्क पुन्हा दिप्तीच्या कंपनीला दिले. त्यात चित्रफीत, ध्वनीफीत, जागतिक प्रदर्शनाचे हक्क या सर्वांचा समावेश होता.२०१४ मध्ये अभिनेत्रीला यात्रा ही वाहिनी तेलगु वाहिनी भक्तीवर दाखवण्यात येत अल्याचे समजले. ही वाहिनी रचना टेलिव्हिजन प्रा. लि. कंपनीच्या मालकीची आहे. त्यावेळी याप्रकरणात तडजोड झाली. त्यानंतर मार्च २०१५ मध्ये भक्ती वाहिनीसोबत अभिनेत्रीचे अॅग्रीमेंट झाले. त्यात ८१ ते १४५ भाग तेलगुमध्ये डब करण्यात आले. ते अॅग्रीमेंट २०१७ मध्ये संपले व ते पुढे वाढवण्यात आले नाही. पण त्यानंतरही तेलगु वाहिनीकडून लायसन्स कॉपी देण्यात आली नसल्याचा आरोपी दिप्तीने तक्रारीत केला आहे. तेवढच नाही, तर वाहिनी व ऑनलाईन प्लटफॉर्मवरही त्याचे भाग दाखवले जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तिने ही मास्टर कॉपीची मागणी केली, पण अद्याप तिला मिळाली नाही. त्यामुळे आपल्या कंपनीला दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोपी तिने केला आहे. तक्रारीनंतर याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने भादंवि कलम ४०९, १२०(ब) सह स्वामित्त्व हक्क कायदा कलम ५१ व ६३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आम्ही तपास करत असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा