एकतर्फी प्रेमातून तरुणीचं डोकं फोडून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वारंवार तरुणी त्याला नकार देत होती. याचाच रागत फारूखच्या मनात होता. रविवारी २६ जुलै रोजी दुपारी मोहम्मद जहांगीर याने ३० वा रोड, इएम इस्टेट खार येथे तरुणीला गाटले

एकतर्फी प्रेमातून तरुणीचं डोकं फोडून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
SHARES

एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीचं हातोडीने डोकं फोडून, स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना खार परिसरात घडली आहे. या घटनेत तरुण आणि तरुणी दोघंही गंभीर जखमी झाले असून दोघांवर सायनच्या लोकमान्य टिळक  रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी खार पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- नवी मुंबईत सोमवारी कोरोनाचे 'इतके' आढळले रुग्ण

मूळचा झारखंडचा राहणारा असलेल्या आरोपी मोहम्मद जहांगीर फारुख हा खार परिसरात रहात असून घरकाम करतो. तर तरुणी १९ वर्षाची असून ती देखील घरकाम करते. पीडित तरुणी खार परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. मागील अनेक दिवसांपासून फारूख हा तरुणीला लग्नासाठी विचारत होता. मात्र वारंवार तरुणी त्याला नकार देत होती. याचाच रागत फारूखच्या मनात होता. रविवारी २६ जुलै रोजी दुपारी मोहम्मद जहांगीर याने ३० वा रोड, इएम इस्टेट खार येथे तरुणीला गाठून त्याने तिला पून्हा लग्नासाठी विचारले. मात्र तरुणीने त्याला नकार दिला. त्यावेळी चिडलेल्या फारूखने तिच्यावर चाकूने वार केले. ऐवढ्यावरच न थांबता त्याने तिच्या डोक्यावर हातोडीने घाव केले. या हल्यात पीडित तरुणी गंभीर जखमी झाली. कशीबशी तिने त्याच्या तावडीतून सुटका करत, घराच्या दिशेने धाव घेतली.

हेही वाचाः- ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांना नानावटीतून डिस्चार्ज, मात्र बिग बी...

या घटनेनंतर आरोपी मोहम्मद जहांगीर फारुख याने इमारतीच्या चौथ्या मल्यावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो फसला. तो गंभीर जखमी झाला. सादर घटनेची माहिती मिळताच खार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघं जखमींना सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी जीवघेणा हल्ला प्रकरणी मोहम्मद जहांगीर याच्या विरोधात खार पोलीस ठाण्यात फारूख विरोधात कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच त्याला अटक करण्यात येईल अशी माहिती खार पोलिसांनी दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा