बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा (Akshay Shinde) मृत्यू झाला आहे. अक्षय शिंदेने पोलिसांच्या बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली की एन्काऊंटर करण्यात आला याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. पोलीस ट्रान्झिट रिमांडसाठी तळोजा जेलमध्ये (Taloja Jail) नेत असताना हा सगळा प्रकार घडला.
सूत्रांच्या माहितीनुसार, अक्षय शिंदेने तळोजा जेलमध्ये उपस्थित पोलीस कर्मचाऱ्याची बंदूक खेचण्याचा प्रयत्न केला आणि तीन गोळ्या झाडल्या. या झटापटीत एका पोलीस कर्मचाऱ्यालाही गोळी लागली आणि जखमी झाला. यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षण करताना त्याच्यावर गोळी झाडली ज्यामध्ये तो जखमी झाला होता.
अक्षय शिंदेची कोठडी आज संपली असून त्याला कोर्टात नेलं जात होतं. अक्षय शिंदेला सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये आरोपी अक्षय शिंदेला फाशी द्यावी या मागणीसाठी बदलापूरकरांनी सहा तासांहून अधिक काळ मध्य रेल्वेची वाहतूक रोखून धरली होती. या प्रकरणात अटकेत असलेला हा आरोपी आहे तरी कोण ते जाणून घ्या...
- बदलापूर अत्याचार प्रकरणातील अक्षय शिंदे प्रमुख आरोपी आहे
- अक्षय हा शाळेत सफाई कामगार म्हणून काम करतो.
- अक्षय शिंदे 24 वर्षांचा आहे.
- शाळेत स्वच्छता ठेवण्याबरोबर मुलांना वॉश रुमला घेऊन जाण्याचं काम अक्षय शिंदे करायचा.
- मुलं अक्षय शिंदे काठीवाला दादा म्हणून ओळखायची.
- आऊट सोर्सिंगच्या माध्यमातून अक्षय शिंदेंला या शाळेत नोकरी मिळालेली.
- अक्षय शिंदेला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.