01/8

मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर NCBनं छापेमारी केली. यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचं देखील नाव समोर आलं. याप्रकरणी आर्यन खान सध्या अटकेत आहे. ड्रग्सप्रकरणी आर्यन खानचं नाव आल्यानं अनेकांना धक्का बसला आहे. मात्र यापूर्वीही अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींची नाव ड्रग्स केसप्रकरणी समोर आली होती. जाणून घेऊयात या सेलिब्रिटिंबद्दल...
02/8

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर एनसीबीला बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शनबद्दलची माहिती मिळाली होती. त्यात सर्वात आधी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचं नाव समोर आलं. रिया चक्रवर्तीनं चौकशीदरम्यान अभिनेत्री रकुलप्रीत हिचं नाव घेतलं होतं, असं बोललं जातं.
03/8

एनसीबीकडून रकुलला समन्स पाठवण्यात आला होता. रकुलनं चौकशीदरम्यान हे सर्व आरोप फेटाळले होते.
04/8

ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचंही नाव चर्चेत आलं होतं. दीपिका आणि तिच्या मॅनेजरच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये ड्रग्जशी संबंधित संभाषण सापडले होते.
05/8

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हिचे नाव ड्रग्स कनेक्शनप्रकरणी समोर आले होते. सारा ही सुशांतच्या फॉर्महाऊसवरील अनेक पार्ट्यांमध्ये सहभागी असायची, अशी माहिती समोर आली होती. याप्रकरणी साराची चौकशी केली असता, तिनं ड्रग्ज घेतल्याचं स्पष्टपणे नाकारलं.
06/8

व्हॉट्सअॅप चॅटमुळे श्रद्धा कपूरही एनसीबीच्या रडारवर होती. श्रद्धा आणि जया शाहच्या व्हॉट्सअॅप चॅटमुळे ती CBD Oil वापरत असल्याचे समोर आले होते. CBD Oil हे ड्रग्सच्या श्रेणीत येतं. यानंतर NCB श्रद्धाची चौकशी केली.
07/8

अर्जुन रामपालचा साथीदार गॅब्रिएला डिमिट्रिएड्सचा भाऊ ड्रग्स प्रकरणात आरोपी आढळला होता. यामुळेच एनसीबीनं अर्जुनच्या घरावरही छापा टाकला. त्या ठिकाणाहून एनसीबीला अर्जुनच्या विरोधात काही पुरावे मिळाले होते. वैद्यकीय गरजांसाठी अर्जुननं ड्रग्स वापरल्याचं चौकशीदरम्यान स्पष्ट केलं होतं.
08/8

लाफ्टर क्विन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्यावरही ड्रग्ज प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप आहे. त्यांच्या घरातून गांजा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर एनसीबीनं दोघांना अटक केली. काही काळानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली.