कोरनाच्या पार्श्वभुमीवर रस्त्यावर थुंकून अस्वच्छता करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. त्या अंतर्गत मुंबईत एकाच दिवसात 57 जणांवर मुंबई पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. त्यांच्या प्रत्येकाकडून महाराष्ट्र पोलिस कायद्या अंतर्गत एक हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सध्या मुंबई आजाराच्या दुसऱ्या पातळीवर आहे. यापूढे नियंत्रण आणले नाही, तर आजार तिसऱ्या टप्प्यात साथीच्या आजारात त्याचे रुपांतर होईल. त्यामुळे याच पातळीवर हा आजार रोखण्यासाठी राज्य सरकार कठोर पावले उचलत आहेत. हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे थुंकी व शिंकेद्वारेही त्याचा प्रसार होऊ शकतो. म्हणून पोलिसांनी थुंकून परिसर अस्वच्छ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात सुरूवात केली आहे.
मुंबईतील प्रत्येक परिमंडळात त्या अंतर्गत विशेष मोहिम राबवण्यात आली. दक्षिण मुंबईतील परिमंडळ एकममध्ये 16 व्यक्तींवर, उत्तर मुंबईतील परिमंडळ 12 मध्ये 31 व्यक्तींवर व पश्चिम उपनगरातील परिमंडळ मध्ये 10 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. भविष्यात या कारवाया आणखी वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात सध्या 52 व्यक्तींना करोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी आणखी तीन नवे रुग्ण सापडले असल्यामुळे सर्व पातळ्यांवर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस ही कारवाई करत आहेत. याशिवाय पोलिसांकडून नागरीकांमध्ये जागृतीही निर्माण केली जात आहे.