वडाळ्यात होंडा सिटी गाडीला अपघात


वडाळ्यात होंडा सिटी गाडीला अपघात
SHARES

वडाळा - वडाळ्यातल्या आणिक आगार मार्गावर होंडा सिंटीचा भीषण अपघात झाला. एमएच 01 बीबी 7053 या क्रमांकाची होंडा सिटी गाडी रविवारी पहाटे वडाळा पूर्व शिवशंकर नगर इथल्या गेट समोरून जात असताना रस्ता दुभाजकाला धडकली. या अपघातात वाहनचालक किरकोळ जखमी झाला आहे.

वडाळा पूर्व येथील बरकत अली नाका ते शिवशंकर नगर दरम्यान रस्ता दुभाजक बसविण्यात आलेले नाहीत. मात्र शिवशंकर नगर पासून पुढे गणेश नगर पर्यंत मध्येच दुभाजक बसवण्यात आले. आणि तेही तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे दुभाजकाचा अंदाज न आल्यास दिवसाला किमान दोन अपघात इथे होतातच असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

परिसरात रस्ता दुभाजक आणि गतिरोधक बसविण्यात यावेत यासाठी 2015 पासून शिवमुद्रा युवा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेमार्फत महानगर पालिका एफ - उत्तर विभाग, वाहतूक विभाग आणि स्थानिक पोलीस ठाण्यात पत्र व्यवहार करण्यात येत आहेत. तसंच सह्यांची मोहीम देखील राबविण्यात अाली होती. पण, प्रशासनाकडून या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप प्रतिष्ठानचे सचिव प्रशांत मोरे यांनी केला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा