अखेर शरद कळसकरचा ताबा सीबीआयकडे


अखेर शरद कळसकरचा ताबा सीबीआयकडे
SHARES

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात एटीएसने अटक केलेल्या शरद कळसकर याला सीबीआय कोठडी देण्याची मागणी अखेर मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी मान्‍य केली. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी कळसकरचा ताबा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागा (सीबीआय)ने मागितला होता. मात्र यापूर्वीच्‍या सुनावणीत न्यायालयाने सीबीआयची ही मागणी फेटाळून लावली होती.


मागणीला यश

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर या तिघांची पोलिस कोठडी सोमवारी संपली. त्यानंतर कळसकरला सीबीआय कोठडी द्यावी, असा विनंती अर्ज पुन्हा एकदा सीबीआयने दिला. कळसकरचा सहभाग डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणात देखील असल्याने सीबीआयला त्याचा ताबा हवा होता. त्यानुसार न्यायालयाने सीबीआयची मागणी अखेर मान्य केली.


सीबीआय कोठडी कशाला?

दाभोलकर हत्येतील गोळी झाडणारा आरोपी म्हणून पकडलेला सचिन अंदुरे व कळसकरची समोरासमोर चौकशी करण्यासाठी ही कोठडी आवश्यक असल्याचं सीबीआयचं म्‍हणणं होतं. न्यायालयाने सीबीआयची मागणी मान्‍य केल्‍यामुळे आता कळसकर आणि अंदुरे यांची एकत्र चौकशी करून घटनाक्रम जुळवण्याचा व हत्येच्या कटाच्या मुळाशी जाण्याचा सीबीआयचा प्रयत्न असेल.



हेही वाचा-

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण: 'हे' होते मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर

डाव्या विचारवंतांना अटक : मानवाधिकार आयोगाची सरकारला नोटीस



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा