मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी आरोपपत्र सादर, लैंगिक अत्याचाराचा उल्लेख मात्र नाही


मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी आरोपपत्र सादर, लैंगिक अत्याचाराचा उल्लेख मात्र नाही
SHARES

मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी मंगळवारी गुन्हे शाखेने अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांकडे आरोपपत्र सादर केले. काही तांत्रिक अडचणींमुळे मंगळवारी हे आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नसून येत्या एक ते दोन दिवसांत ते दाखल करून त्याच्या प्रती आरोपींना दिल्या जातील.


काय आहे प्रकरण?

भायखळा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या मंजुळा शेट्येचा जेल कर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता. या प्रकरणी दाखल एफआयआरमध्ये मंजुळावर लैंगिक अत्याचार झाल्याचं अगदी स्पष्टपणे म्हटलं होतं. मात्र, पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्रात त्याचा कोणताही उल्लेख नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.


काय आहे आरोपपत्रात?

९९० पानी आरोपपत्रात ९७ जेल कर्मचाऱ्यांच्या जबाबासह एकूण १८२ जणांचे जबाब घेण्यात आले आहेत. ज्यात भायखळा जेलमध्ये असलेल्या शीना बोरा हत्येची आरोपी इंद्राणी मुखर्जीचाही जबाब आहे. भायखळा जेलमधील सीसीटीव्ही केमेऱ्यांचे फुटेजदेखील एक महत्त्वाचा पुरावा असल्याचं आरोपपत्रात म्हटलं आहे.

२३ जूनला क्षुल्लक कारणावरून मंजुळाला जेलच्या कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली होती. ज्यात मंजुळाचा मृत्यू झाला होता. मंजुळाच्या हत्येप्रकरणी भायखळा जेलच्या तत्कालीन जेल अधीक्षक मनीषा पोखरकरसोबत जेलच्या महिला पोलीस कर्मचारी वसिमा शेख, बिंदू नाईकडे, शितल शेगावकर, आरती शिंगणे आणि सुरेखा गुळवे यांच्यावर हत्या करणे (कलम ३०२), पुरावा नष्ट करणे (कलम २०१) आणि कट रचणे कलम (१२० (ब) असे आरोप ठेवण्यात आले आहेत.



हेही वाचा

मंजुळा शेट्ये प्रकरणाचा सूत्रधार सरकारमध्येच?


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा