ट्रॉम्बे - फेसबुकवर टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे ट्रॉम्बे परिसरात तणावाचं वातावरण आहे. या पोस्टमुळे संतप्त समाजकंटकांनी पोलिसांवर दगडफेक करत पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ देखील केली. या प्रकरणी पोलिसांनी 26 जणांना ताब्यात घेतले. तसंच या परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.
एका 25 वर्षांच्या तरुणाने त्याच्या फेसबुक उकाउंटवर एक आक्षेपार्ह फोटो अपलोड केला होता. त्यामुळे शनिवारी रात्री ट्रॉम्बे परिसरातील चीता कँपमध्ये तणावाचं वातावरण होतं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. तर त्यावेळी संतप्त झालेल्या 100 ते 150 जणांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. यासह पोलिसांचे तीन वाहनांची जाळपोळ केली.