पार्किंग वादातून १ वर्षाची शिक्षा


पार्किंग वादातून १ वर्षाची शिक्षा
SHARES

पार्किंगवरुन वाद करणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं अाहे.  पार्किंग करण्यावरून महिलेशी घातलेल्या वादामुळं एका व्यक्तीला कोर्टाने १ वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली अाहे. २०१४ मध्ये ही घटना घडली होती.


नक्की काय झालं ?

मुंबईत गाडी पार्किंगवरुन एका व्यक्तीचा एका एअर होस्टेससोबत वाद झाला होता. या व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने कार पार्किंग केली होती.  ही एअर होस्टेस महिला अाॅफिसला जाण्यासाठी निघाली असता तिला या कारमुळे बाहेर पडता अालं नाही. तिने याबाबत विचारलं असता या व्यक्तीने तिला अपशब्द वापरले.  तुमच्यासारख्या हायक्लास लोकांमुळे आमचं जगण कठीण झालं अाहे. तू आणि तुझ्या घरातले या बिल्डींगला कलंक आहे, अशा शब्दात या अारोपीने महिलेला सुनावले. याविरोधात तिने तक्रार दाखल केली होती.  


घटनेनंतरही अरेरावी

घटनेनंतर २ महिन्यांनी मी वडील अाणि बाहेर जात असताना ही व्यक्ती अामच्यासमोर अाली. यावेळीही त्याने माझ्या वडिलांशी असभ्य भाषा वापरून जे करायचे ते करा असं अरेरावीने म्हणाला,  असं या महिलेने कोर्टात सांगितलं. अारोपीने महिलेचा स्वाभिमान दुखावला असून सार्वजनिक ठिकाणी अशी वर्तणूक अशोभनीय असल्याचे म्हणत कोर्टाने या व्यक्तीला १ वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा दिली. 



हेही वाचा -

पाच वर्षाच्या मुलाचं खंडणीसाठी अपहरण

नशेसाठी त्यांनी पतपेढी लुटली




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा