फोर्ट - राज्यात उघड्यावर फटाक्यांची विक्री सुरू आहे. त्यामुळं लोकांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या सर्व फटाक्यांच्या अनधिकृत दुकानांवर आणि विना परवाना फटाके विकणाऱ्या विक्रेत्यांवर येत्या 8 दिवसात कठोर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले.
सरकारी यंत्रणांनी पुढील आठ दिवसात काय कारवाई केली? याचा अहवाल 25 ऑक्टोबर रोजी न्यायालयात सादर करण्यास न्यायालयाने सांगितले. नाशिकचे चंद्रकांत लासुरे यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. गेली तीन वर्षे लासुरे उघड्यावर फटाके विकणाऱ्या विक्रेत्यांच्या विरोधात लढा देत होते.