फेसबुकवर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

फेसबुक ‘मार्केटप्लेस’ च्या आधारे अपहरण करून लुटणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला.

फेसबुकवर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
SHARES

फेसबुक (facebook) ‘मार्केटप्लेस’ (marketplace)च्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधून अपहरण करत लुटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या टोळीतील आरोपींनी सवलतीच्या दरात सोन्याची बिस्किटे विकण्यासाठी जाहिराती पोस्ट केल्या, डील फायनल करण्यासाठी अनेक बैठका निश्चित केल्या आणि नंतर सोन्याची बिस्किटे वितरित केली. काही सदस्यांनी बनावट पोलिसांच्या वेषात त्या ठिकाणी छापा टाकला. या बनावट छाप्यांमध्ये या टोळीने लोकांचे अपहरण केले आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लुटली.

200 ग्रॅम सोन्याचे बिस्किट देण्याचे आश्वासन देऊन 13 लाख रुपयांची रोकड लुटल्याचा आरोप असलेल्या ज्वेलरी स्टोअरचे मालक रवींद्र रतनलाल चौधरी (50) यांनी गेल्या महिन्यात गुन्हा दाखल केला होता. त्यांनी सांगितले की, विक्रेते प्रत्येकी 10 ग्रॅम सोन्यावर 500 रुपये सूट देणार होते. 

मुलुंड (mulund) येथे दुकान चालवणारे रवींद्र रतनलाल चौधरी त्यांचा मित्र सुनील इंगळे आणि दुसरा मित्र रतनसिंग राठोड यांनी 26 जून रोजी खारघर (kharghar) येथे विक्रेत्याला भेटायचे ठरवले. पैसे घेऊन जाणाऱ्या राठोडला आरोपींनी पोलीस असल्याचे दाखवून घटनास्थळावरून पळवून नेले. राठोड यांनी दिलेल्या जवाबानुसार त्यांना मारहाण करून लुटण्यात आले.

पोलिस उपायुक्त (गुन्हे शाखा) अमित काळे यांनी सांगितले की, गुन्हे शाखेचे केंद्रीय पथकाचे प्रभारी पोलिस निरीक्षक सुनील शिंदे यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथके तयार केली आहेत. त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकलची नंबर प्लेट एका फायनान्स कंपनीकडे शोधून काढली, जी कर्जाची परतफेड न केल्याने एका व्यक्तीकडून वसूल केली होती. 

फायनान्स कंपनीकडून पोलिसांना राज उर्फ मोहम्मद गालिब शेख (४०, कुर्ला येथील रहिवासी) याची माहिती मिळाली, ज्याने ही दुचाकी खरेदी केली होती. त्याच्या अटकेनंतर उर्वरित सहा आरोपींचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्यात आले. विशाल तुपे (21), रोहित शेलार (26), नीलेश बनगे (26), शिवाजी चिकणे (36), विशाल चोरगे (36) आणि दिलेर खान (46) अशी टोळीतील आरोपींची नावे आहेत.

या टोळीने गोवंडी, सानपाडा, पनवेल, भिवंडी येथे देखील लोकांची अशीच फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. या टोळीतील आरोपींना 12 जुलैपर्यंत खारघर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.




हेही वाचा

ट्रेन आणि प्लॅटफॉर्म गॅपमध्ये पडून तरूणाचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा