चीनच्या कंपनीचा ईमेल हॅक करून मुंबईतील कंपनीला लाखोंचा गंडा

मार्च महिन्यात चीनमधील कंपनीचा ईमेल हॅक करण्यात आला. त्यात संबंधीत कंपनी ही मुंबईतील साधना कंपनीसोबत आर्थिक व्यवहार करत असल्याचं दिसून आल्यानंतर चोरट्यांनी साधना कंपनीला लक्ष करत, साधना कंपनीला व्यवहाराचे ८९ लाख ९५ हजार १८५ रुपयेे मेलद्वारे मागितले.

चीनच्या कंपनीचा ईमेल हॅक करून मुंबईतील कंपनीला लाखोंचा गंडा
SHARES

चीनमधील एका नामांकित कंपनीचा ईमेल हॅक करून मुंबईतील एका कंपनीला ५९ लाख रुपयांचा गंडा घातल्याचं उघडकीस आलं आहे.  या प्रकरणी व्ही.पी.रोड पोलिस ठाण्यात अनोळखी हॅकरविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.


मेलद्वारे पैसे मागितले

गिरगावच्या सीपी टँक परिसरात साधना नायट्रोकाॅम कंपनीचं कार्यालय आहे. या कंपनीचे चीनमधील एका नामांकित कंपनीसोबत व्यवहार सुरू होते. मार्च महिन्यात चीनमधील कंपनीचा ईमेल हॅक करण्यात आला. त्यात संबंधीत कंपनी ही मुंबईतील साधना कंपनीसोबत आर्थिक व्यवहार करत असल्याचं दिसून आल्यानंतर चोरट्यांनी साधना कंपनीला लक्ष करत, साधना कंपनीला व्यवहाराचे ८९ लाख ९५ हजार १८५ रुपयेे मेलद्वारे मागितले. मात्र, चोरट्यांनी मेलमधील बँक खात्याचा नंबर स्वत:चा दिला होता. 


५९ लाख काढले

 साधना कंपनीने ८९ लाख ९५ हजार रूपये चीनकडून आलेल्या खात्यावर वळवले. त्यानंतर साधना कंपनीने पैसे पोच झाल्याच्या खात्रीसाठी चीनी कंपनीच्या मुंबईतील कार्यालयात फोन करून चौकशी केली असत हा फसवणुकीचा प्रकार पुढे आला. चौकशीत चोरट्यांनी पाठवलेल्या पैशातून ५९ लाख काढून घेतले असल्याचं उघडकीस आलं.  या प्रकरणी साधना कंपनीद्वारे व्ही.पी.रोड पोलिस ठाणेयात तक्रार नोंदवली असून आरोपींचा शोध सुरू आहे.



हेही वाचा -

दाऊदचा हस्तक शकील'लंबू'चा हृदयविकाराने मृत्यू




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा