सायबर चोरट्यांनी घातला इटालियन कंपनीला १३० कोटींचा गंडा

मुंबईतल्या एका प्रसिद्ध इटलीयन कंपनीला सायबर चोरट्यांनी १३० कोटी रुपयांना गंडवल्याची घटना उघडकीस आली. चीनमधील काही हॅकर्सकडून कंपनीला गंडवण्यात आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

सायबर चोरट्यांनी घातला इटालियन कंपनीला १३० कोटींचा गंडा
SHARES

मुंबईतल्या एका प्रसिद्ध इटलीयन कंपनीला सायबर चोरट्यांनी १३० कोटी रुपयांना गंडवल्याची घटना उघडकीस आली. चीनमधील काही हॅकर्सकडून कंपनीला गंडवण्यात आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. तर ही नव्या वर्षातील आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी असल्याचंही पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.


ईमेल अकाऊंट केलं हॅक

माईरे टेकनिमाॅन्ट नावाच्या इटलीमधील नामांकित उद्योग समुहाची टेक्निमोंट एसपीए ही सहाय्यक कंपनी आहे. ही कंपनी अभियांत्रिकी, ऊर्जा आणि रसायने यासारख्या क्षेत्रांमध्येही ही कंपनी कार्यरत आहे. याच कंपनीची एक शाखा मुंबईत असून या कंपनीला सायबर चोरट्यांनी १३० कोटींचा गंडा घातला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती या कंपनीच्या ई-मेल अकांऊटवर हॅकर्सकडून एक ई-मेल आला. सायबर चोरट्यांनी कंपनीचे सीईओ पिएपोबर्टो फोलगिएरो यांचं ईमेल अकाऊंट हॅक करून हा ईमेल पाठवला होता. या ईमेलमध्ये चीनमधील एका जमीन संपादनाच्यासंदर्भात चर्चा करण्यासंदर्भातील मजकूर होता. तर या चर्चेत कंपनीचे सीईओ, स्वित्झर्लंडचे नामांकित वकील आणि कंपनीचे अन्य वरिषअठ अधिकारी सामील होणार असल्याची खोटी माहिती देण्यात आली होती.


असा घातला गंडा

दरम्यान चोरट्यांनी भारतातील कंपनीच्या शाखेत कार्यरत असलेल्या कर्मचार्यांना काही अडचणींमुळे इटलीमधून रक्कम ट्रान्सफर करणं शक्य नसल्याचं सांगत आर्थिक मदत करण्याची मागणी केली. त्यानुसार इटालियन कंपनीतील भारतामधील मुख्य अधिकार्यांनी नोव्हेंबरमध्ये एका आठवड्यात ५६ लाख डाॅलर, ९४ लाख डाॅलर आणि ३६ लाख डाॅलर असे एकूण १.३६ कोटी डाॅलर, १३० कोटी रुपये हाँगकाँगच्या एका बँकेत ट्रान्स्फर केले. पण सुदैवानं पुढील रक्कम ट्रान्सफर करण्याआधीच कंपनीचे चेअरमन 'फ्रैंको गिरिनगेली' यांच्या ही बाब लक्षात आली आणि त्यांनी वेळीच मुंबई पोलिसांची मदत घेत पुढील व्यवहार त्वरीत थांबवले. पण तोपर्यंत कंपनीला तब्बल १३० कोटींचा गंडा बसला होता.


मृत व्यक्तिच्या नावाचाही गैरवापर

एका बड्या कंपनीला गंडा घालणारे हे सायबर चोरटे किती आणि कसे चाणाक्ष आहेत हे ही यातून समोर आलं आहे. सायबर हॅकर्सनी चेअरमनच्या लेखनशैलीचा पूर्ण अभ्यास करत त्यानुसारच ईमेल पाठवला होता. त्यासाठी कंपनीच्या आयटी सिस्टीममध्ये प्रवेश करून कंपनीच्या ईमेलचा अभ्यास करणारी अत्याधुनिक यंत्रणा हॅकर्सनी वापरल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. तसेच या फसवणूकीसाठी वापरण्यात आलेला फेक आयडी हा 'लुइगी कोराडी' या नावाने असून लुइगी हे इटालियन अभियंता आणि शिक्षक होते, मात्र त्यांचा १९२१ मध्ये मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अत्यंत चतुराईनं सायबर चोरट्यांनी १९२१ मध्येच मेलेल्या व्यक्तिच्या नावाचा गैरवापर केल्याचंही पोलिस तपासात उघड झालं आहे. महत्त्वाचं म्हणजे हाँगकाँगमधील ज्या बँकेत पैसे ट्रान्स्फर झाले. ते खाते ही बनावट कागदपत्रांद्वारे उघडले गेले असल्याचे उघड झाले. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून या वर्षातली सर्वात मोठा सायबर फसऴणूक असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.



हेही वाचा -

आक्षेपार्ह विधानामुळं जिमखान्याचे हार्दिक पांड्याचे मानद सदस्यत्व रद्द




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा