शिक्षकासोबत विद्यार्थीनीचं लफडं, घरातून चोरले १९ लाख

मैत्रिणीच्या कुटुंबिया कोरोना झाल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना क्वारन्टाईन केले जाणार आहेत. घरी कोणी नसल्यामुळे घरातून मौल्यवान दागिन्यांची चोरी होऊ शकते

शिक्षकासोबत विद्यार्थीनीचं लफडं, घरातून चोरले १९ लाख
SHARES

प्रेम आंधळ असतं, त्यामुळे प्रेमात पडलेल्या व्यक्ती कुठल्या थराला जाईल याची शाश्वती देऊ शकत नाही. अशीच एक घटना मुंबईच्या ओशिवरा परिसरात घडली आहे. आपल्या स्कूल टिचरच्या प्रेमात पडलेल्या २१ वर्षाच्या तरुणीने स्वतःचा संसार थाटण्यासाठी घरातली तिजोरीच रिकामी केली. तरुणी बेपत्ता झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी तरुणीने तिजोरीची चावी मागितली होती, हे आठवल्यानंतर तरुणीच्या बापाने तिजोरी पाहिली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. या प्रकरणी तरुणीच्या बापाने दिलेल्या तक्रारीनंतर ओशिवरा पोलिसांनी दोघांना पंजाबच्या अमृतसर येथून अटक केली आहे.  

हेही वाचाः- Raj Thackeray: लॉकडाऊन हवं का नको? मनसेनं सुरू केलं सर्वेक्षण

ओशिवरा परिसरात आपल्या वडिलांसोबत २१ तरुणी उजमा कुरेशी ही राहते. ती शाळेत दहावीत असतानाच, शाळेचे स्कूल टिचर चंद्रदिप सिंग अरोरा (३५) याच्या प्रेमात पडली.  चंद्रदीप हा शाळेत पीटी टिचर म्हणून कामाला होता. शाळेपासून सुरू असलेल्या प्रेमाचे रुपांतर वैवाहिक जीवनात बदलण्याचा दोघांनी निश्चय केला होता. मात्र घरचे त्यांच्या नात्याला स्विकारणार नाहीत याची कल्पना दोघांना होती. मात्र संसार थाटन हेही तितकचं अवघड होतं. त्यामुळेच वडिलांच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचा प्लान तरुणीने आखला. २७ जुलै रोजी तरुणीने तिच्या वडिलांजवळ आपल्या मैत्रिणीच्या कुटुंबियांना कोरोना झाल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना क्वारन्टाईन केले जाणार आहेत. घरी कोणी नसल्यामुळे घरातून मौल्यवान दागिन्यांची चोरी होऊ शकते. त्यामुळेत तिने त्यांचे मौल्यवान दागिने आपल्याकडे ठेवण्यासाठी दिले असल्याची थाप मारली. ते दागिने ठेवण्यासाठी तरुणीने वडिलांकडे तिजोरीच्या चाव्या घेतल्या होत्या.

हेही वाचाः- IPL मध्ये खेळण्याची संधी हुकल्याने मालाडमध्ये क्रिकेटरची आत्महत्या

दोनच दिवसांनी म्हणजेच ३० जुलै रोजी तरुणी अचानक बेपता झाली. तरुणीच्या वडिलांनी त्या प्रकरणी ओशिवरा पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार नोंदवली. अचानक तरुणीच्या वडिलांना आपल्यामुलीने दोन दिवसांपूर्वी तिजोरीच्या ताव्या घेतल्याचे आठवले. त्यांनी तिजोरी पाहिली असता. त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली होती. तिजोरीतून १९ लाखांचे सोनं आणि काही पैसे चोरले होते. हीबाब तरुणीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी तरुणीच्या मोबाइलचे लोकेशन ट्रेस केले. त्यावेळी  तरुणीचे लोकेशन पंजाबच्या अमृतसरच्या एका हाॅटेलमध्ये आढळले. पोलिसांनीही वेळ न दवडता. पंजाब पोलिसांच्या मदतीने त्यांना पकडले. दोघांच्या चौकशीत त्यांनी केलेल्या चोरीची कबूली पोलिसांना दिली. चोरलेलं सोन दोघांनी गोरेगावच्या एका बॅकेतील लाॅकरमध्ये ठेवले असल्याचे सांगितले. पोलिसांनी चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत करत दोघांविरोधात ३७९, ४०६, ४११, ३४ भा.द.वि कलमांतर्गत गुन्हा नोंदवला असून न्यायालयाने दोघांना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा