प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाबरिया याने कॉमेडियन कपील शर्मालाचीही साडेपाच कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी कपील शर्माने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा नोंदवत, त्या गुन्ह्यात दिलीप छाबरियाला अटक केली आहे.
हेही वाचाः- ११वीच्या प्रथम प्राधान्य फेरीसाठी 'इतक्या' जागा
कपील शर्माने छाबरियारियाला महागडी व्हनिटी व्हॅन बनवण्यास सांगितले होते. त्याचे सर्व पैसे शर्माने दिले होते. पण त्याबदल्यात त्याला व्हॅन मिळालीच नाही. याप्रकरणी गेल्यावर्षी कपील शर्माने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. नुकतीच कार नोंदणीप्रकरणी दिलीप छाबरियाला अटक झाल्यानंतर त्याबाबतच्या बातम्या पाहून कपील शर्मा यांनी याप्रकरणी मुंबई पोलिसांना संपर्क साधला. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी गुरूवारी त्याचाजबाब नोंदवला आहे. याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करून पोलिस छाबरियाचा सोमवारी याप्रकरणी ताबा घेतला.
हेही वाचाः- ड्रग्ज तस्करी प्रकरणात मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवालाची NCB कडून अटक
२०१७ मध्ये कपील शर्माने छाबरियाला पाच कोटी रुपये दिले होते. त्यानंतर २०१८ जीएसटीच्या बहाण्याने आणखी ४० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानंतरही शर्माचा कार मिळाली नाही. त्यावेळी छाबरियाने ६० लाख रोख रकमेची मागणी केली. कार मिळाली नसल्यामुळे, कपीलने रक्कम दिली नाही. त्यानंतर व्हॅन तयार नसतानाही एवढे दिवस गॅरेजमध्ये पडून असल्याचे सांगून पार्किंग चार्जेसच्या नावाखाने छाबरियाने १३ लाख रुपयांचे बिल कपीलला पाठवले. पैसे घेऊनही व्हॅन न मिळाल्याने अखेर कपील शर्माने याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. यावेळी जबाब नोंदवण्यासाठी आलेल्या कपील शर्माने सध्या व्हाईट कॉलर गुन्हे वाढत आहे. त्यामुळे अशा व्यक्तींवर कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्याने सांगितले. याप्रकरणी पोलिस छाबरियाच्या बँक खात्याची पडताळणी करत आहेत