अंमली पदार्थ तस्करांना शहरातून हद्दपार करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली अाहे. त्यामुळे तस्करांनी आता अंमली पदार्थ पोचवण्यासाठी महिलांचा वापर करण्यास सुरूवात केल्याचं एका कारवाईतून उघडकीस अालं अाहे. नुकतंच मुंबई अंमली पदार्थ विभाग आणि केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने ४६५ ग्रॅम अॅफेटामाइन ड्रग्जसह एका २७ वर्षीय महिलेला अटक केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक महिला अॅफेटामाइन हे ड्रग्ज घेऊन येणार असल्याची माहिती एनएनसी आणि केंद्रीय अंमली पदार्थ विभागाला मिळाली होती. त्यानुसार दोन्ही पथकांनी मंगळवारी विमानतळावर सापळा रचला. यावेळी परदेशातून आलेल्या शेख फुरकाना खातून ही महिला विमानतळाच्या इमिग्रेशन विभागात बॅग तपासणीसाठी आली होती. सुरक्षा रक्षकांनी बॅग तपासली. त्यांना काही संशयास्पद आढळलं नाही. मात्र, श्वान पथकांनी दुसऱ्यांदा शेख यांची बॅग तपासली असता ड्रग्जच्या वासाने कुत्र्यांनी भुंकण्यास सुरूवात केली. पोलिसांनी बॅगेची झडती घेतली असता बॅगेच्या एका कोपऱ्यात ड्रग्ज सापडले. हे ड्रग्ज बॅगेच्या आतल्या बक्कलमध्ये लपवले होते. या ४६५ ग्रॅम अॅफेटामाइन ड्रग्जची किंमत ही २३ लाख २५ हजार इतकी अाहं.
ड्रग्ज मुंबईत तस्करीसाठी आणले असल्याची माहिती एनएनसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. एका महिला दलालाच्या मदतीने हे ड्रग्ज मुंबईत विकले जाणार असल्याचे उघडकीस आल्यानंतर बुधवारी सकाळी पोलिसांनी एका संशयित महिलेला कांदिवलीतून ताब्यात घेतल आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा-
सावधान! ब्रॅंडेड दुधाच्या पिशवीत भेसळयुक्त दूध, भेसळखोरांचं रॅकेट उघड
अश्लील व्हिडिओ काढून विवाहितेला धमकावणारा पोलिसांच्या ताब्यात