पतीला विकत देते का? प्रेयसीने देऊ केले पैसे

धीरच्या प्रेयसीने सुधीरला पत्नीला ४ ते ५ लाख रुपये देऊन शांत करण्यास सांगितलं. त्यासाठी पैसे देण्याचीही आॅफर दिली. एवढंच नव्हे, तर पैसे देऊनही तिने न ऐकल्यास तिला मारून टाकण्यास सांगितलं, असा आरोप सुधीरच्या पत्नीने केला.

पतीला विकत देते का? प्रेयसीने देऊ केले पैसे
SHARES

समाजातल्या बऱ्याच घटनांचं प्रतिबिंब जसं रूपेरी पडद्यावर उमटतं तसंच कित्येकदा एखाद्या सिनेमाचं कथानकही वास्तव जीवनात आकारास येतं. काही वर्षांपूर्वी अनिल कपूरचा 'जुदाई' नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला हाेता. या सिनेमात लग्न झालेल्या अनिल कपूरवर प्रेम करणारी प्रेयसी त्याच्या बायकोला पैसे देऊन त्याला खरेदी करते. असाच सेम टू सेम प्रकार परळ येथील भोईवाड्यात घडला आहे.

परळच्या शिरोडकर मंडई परिसरातील म्युनिसिपल चाळीत राहणाऱ्या सुधीर दरेकर (४५) यांना नुकतीच भोईवाडा पोलिसांनी अटक केली. त्यांच्या अटकेमागचा किस्सा ऐकून उपस्थित पोलिसही चक्रावले.


काय आहे किस्सा?

मुंबई महापालिकेत कामाला असलेल्या सुधीर यांचं १२ वर्षापूर्वी लग्न झालं होतं. असं असूनही काही वर्षांपासून सुधीर यांचे एका तरुणीसोबत प्रेमसंबध सुरू होते. ही बाब २०१२ मध्ये त्यांच्या पत्नीला कळाली. त्यानंतर दोघांमध्ये वारंवार खटके उडू लागले.

याच दरम्यान सुधीर यांचे अनैतिक संबध असलेल्या तरुणीच्या घरातल्यांनी तिच्या लग्नासाठी हालचाली सुरू केल्या. मात्र त्या तरुणीला देखील सुधीरशीच लग्न करायचं होतं. मात्र सुधीरच्या पत्नीचा अर्थातच त्याला विरोध होता. त्यावर सुधीरच्या प्रेयसीने सुधीरला पत्नीला ४ ते ५ लाख रुपये देऊन शांत करण्यास सांगितलं. त्यासाठी पैसे देण्याचीही आॅफर दिली. एवढंच नव्हे, तर पैसे देऊनही तिने न ऐकल्यास तिला मारून टाकण्यास सांगितलं, असा आरोप सुधीरच्या पत्नीने केला.


व्हिडिओ रेकाॅर्डिंग

त्यानुसार १३ जून रोजी रात्री दीड वाजता सुधीर पत्नीला पैसे घेऊन शांत बसण्यासाठी विनवणी करू लागला. हा प्रकार सुरू असताना सुधीरची पत्नी पुरावा म्हणून सुधीरच्या न कळत मोबाइलवर त्याचा व्हिडिओ काढत होती. ही बाब सुधीरच्या लक्षात आल्यानंतर त्याने तिला मारण्यास सुरूवात केली.


जीवे मारण्याचा प्रयत्न

सुरूवातीला सुधीरने उशीने त्याच्या पत्नीचं तोंड दाबलं. त्यानंतर पाईप आणि हातांनी तिला मारहाण करू लागला. पत्नीला ठार मारण्याच्या उद्देशाने तो घरात वरवंटा शोधत असताना त्याच्या पत्नीने घरातून पळ काढत थेट भोईवाडा पोलिस ठाणे गाठलं. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी सुधीरला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.



हेही वाचा-

गुजरातच्या दुहेरी हत्याकंडातील मुख्य आरोपीला भायखळ्यातून अटक

अॅडमिशनच्या नावाखाली गंडा घालणारा अटकेत



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा