काही दिवसांपूर्वी पूर्व द्रूतगती मार्गावर दोन व्यक्तीनी क्लिन अप मार्शल असल्याचे सांगून एका दुचाकीस्वाराकडून सार्वजनिक ठिकाणी लगवी केल्याप्रकरणी ४०० रुपये उकळले. या बोगस क्लिन अप मार्शलचा वरिष्ठ पत्रकार प्रशांत बडे यांनी पर्दाफाश केल्यानंतर विक्रोळी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचाः- सुशांत प्रकरणात बिहार पोलिसांनी दखल देऊ नये – सुप्रीम कोर्ट
मुंबईच्या पूर्व द्रूतगती मार्गावर ९ आँगस्ट रोजी पंतनगर ब्रिज जवळ संजय जेठवा हे दुचाकीहून जात होते. त्यावेळी त्यांनी नैसर्गिक विधी करण्यासाठी गाडी थांबवली. त्यानंतर ते निघत असताना दोन आरोपींनी त्यांची वाट अडवली. त्यावेळी दोघांनी आपण क्लिन अप मार्शन असल्याचे सांगत, सार्वजनिक ठिकाणी नैसर्गिक विधी केल्याप्रकरणी ४०० रुपये दंड असल्याचे सांगितले. नेमके त्याच वेळी त्या ठिकाणाहून वरिष्ठ पत्रकार प्रशांत बडे हे देखील जात होते. त्यांना या दोघाजणांवर संशय आल्याने त्यांनी संजय जेठवा यांच्याजवळ विचारपूस केली. बडे यांनी दोघा आरोपींजवळ त्यांचे कार्ड आणि काॅन्ट्रेक लेटर मागितले असता. दोघांनी ओळखपत्र दाखवली. मात्र काॅन्ट्रेक लेटर त्यांना दाखवता आले नाही.
हेही वाचाः- Mumbai Rains : शुक्रवारी मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता
प्रशांत बडे यांनी त्यांच्या या फसवणूकीचा एक व्हिडिओ बनवल्यानंतर त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. हा व्हिडिओ सोशल मिडियावर वायरल झाला. ज्याची दखल विक्रोली पोलिसांनी घेत, दोन्ही बोगस क्लिन अप मार्शल विरोधात पोलिसांनी ४१९,४२०,३४ भा.द. वि कलमांर्गत गुन्हा नोंदवला. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.