वडाळा इथे एका भरधाव कारने एका 4 वर्षाच्या मुलाला चिरडलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडाळ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाजवळ हा अपघात झाला असून 4 वर्षीय आयुष किनवडे याचा मृत्यू झालाय.
पोलिसांनी सांगितलंय की, पीडितेचे कुटुंब फूटपाथवर राहते आणि त्याचं वडील मजूर आहेत. 19 वर्षाच्या तरुणाने हा अपघात केलाय. हुंडाई क्रेटा चालवणारा आरोपी संदीप गोळे असं या आरोपीचं नाव आहे. पोलिसांने त्याला अटक केलीय.
संदीप गोळे हा विलेपार्लेमध्ये राहतो. गोळे हा तरुण त्याची कार रिव्हर्स घेत होता. यावेळी रस्त्यावर खेळत असणाऱ्या आयुषला आरोपीने चिरडलं. या अपघातात आयुषला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्या तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान अपघाताच्या वेळी चालक दारूच्या नशेत होता का? याचा तपास पोलीस अधिकारी करत आहेत. त्याच्या वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे. तसंच घटनास्थळाची परिस्थिती समजण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही देखील तपासत आहेत. तसंच या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.
हेही वाचा