विभागातील बारमध्ये अवैध धंदे सुरू असल्याचे पुढे आल्यानंतर पोलिस आयुक्तांनी एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर थेट निलंबनाची कारवाई केली आहे. आयुक्तांच्या या कारवाईची मुंबईतील इतर पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठांनी धास्ती घेतली असून परिसरातील बारची झाडाझडती सुरू केली आहे. या कारवाईमुळे पोलिस दलात विविध चर्चांना उधान आले आहे.
शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि बारमधील गैरप्रकारांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस आयुक्त संजय बर्वे यांच्या आदेशानुसार सर्व पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना परिसरातील बारबाहेर दुपारी १ ते रात्री १२ पर्यंत गस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गस्तीवरील पोलिस कर्मचाऱ्यांना संबधित बारमध्ये कुठल्याही प्रकारच्या नियमांचे उल्लघंन होणार नाही याबाबत सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असताना. गावदेवी पोलिस ठाणे परिसरातील स्लेटर रोड परिसरात गोल्डन गुज बारमध्ये पोलिस हस्तीवर असताना देखील नियमांचे उल्लघंन होत असल्याची माहिती आयुक्तांना मिळाली होती.
या बारवर १६ सप्टेंबर २०१८ मध्ये पहिल्यांदा पोलिस उपायुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी कारवाईकरत गैर प्रकारांना रोखत कलम 294,34 भा.द.विसह 3,8(1)(2) व 8(4) अँक्टसह गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर असा प्रकार पून्हा घडणार नाही. याची खबरदारी घेण्याबाबत गावदेवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोकुळसिंग पाटील यांना देण्यात आल्या होत्या. आयुक्तांच्या ताकीदीनंतर काही महिने बारमध्ये कोणतिही हालचाल नव्हती. दरम्यान काही दिवसांपासून बार मालकाने बारमध्ये गैरप्रकार सुरू केले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर अंमली पदार्थ विभागाच्या पोलिसांनी 27 एप्रिलरोजी पून्हा त्या बारवर कारवाई केली. त्यावेळी बारमध्ये महिला ग्राहकांशी अश्लील वर्तन करताना आढळून आल्या,
नेमके त्याच दिवशी पाटील हे रात्रपाळीला गस्तीला होते. ही बाब पुढे आल्यानंतर वारंवार ताकीद देऊन ही बारमध्ये सुरू असलेला गैरप्रकारावर कानाडोळा करणाऱ्या पाटील यांच्यावर आयुक्तांनी निलंबनाचा बडघा उगारला. 5 मे रोजी पाटील यांना तात्काळ सेवेतून निलंबित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईचा धसका आता इतर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी घेतला असून परिसरातील बार आणि सर्व अवैध धंदे करणाऱ्यांच्या मुस्क्या आवळण्यास सुरूवात केली आहे.
हेही वाचा
कारागृह कैद्यांनी ओव्हरलोड; क्षमतेपेक्षा १३४ टक्के जास्त कैदी