मुंबई - मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 2 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. कस्टम या विभागाने ही कारवाई केली आहे. या सोन्याची किंमत तब्बल 54 लाख एवढी आहे. कस्टम विभागाने या प्रकरणी एका विमलेश पांचाळ नावाच्या प्रवाशाला अटक केली आहे. त्याच्याकडून 18 सोन्याचे बार हस्तगत करण्यात आले. विमलेश पांचाळने बसण्याच्या सीटखाली हे सोनं लपवलं होतं. त्याच्या चौकशी केली असता कस्टम विभागाने सोनं जप्त केलं.