स्टार प्लसवरील नवीन मालिका 'कृष्णा चली लंडन' या मालिकेतमध्ये काम देण्याच्या नावाखाली नवोदित कलाकारांना बोगस करारपत्रक देऊन फसवणूक करणाऱ्या भामट्यांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अविनाश अरूणकुमार शर्मा (२४), विनोद भंडारी (३०) अशी या आरोपींची नावे आहेत. या दोघांनी आतापर्यंत ७० ते ८० नवोदित कलाकारांना टोप्या घालून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याचं पोलिसांनी सांगितलं.
सिंटा प्रायव्हेट लिमिटेडचे अधिकारी असल्याचे भासवून अारोपी गोरेगाव येथील फिल्म सिटी येथे नवोदितांना हेरायचे. त्यांना स्टार प्लसवरील कृष्णा चले लंडन या मालिकेत काम देण्याचं आश्वासन द्यायचे. त्यासाठी त्या नवोदित कलाकारांसोबत बनावट करार करून नेटबँकिंग, पेटिएमद्वारे पैसे उकळायचे. पैसे खात्यावर जमा झाल्यानंतर या दोघांचा फोन बंद व्हायचा अशा प्रकारे या दोघांनी तब्बल ७० ते ८० जणांची अशा प्रकारे फसवणूक केली आहे. याबाबतच्या तक्रारीत वाढ झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून हा गुन्हा पुढील तपासासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे सोपवला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून या दोघांना उपनगरातून अटक केली.
हेही वाचा -
Exclusive : कुख्यात शस्त्र तस्कर दानिश अली मुंबई पोलिसांच्या ताब्यात
टिळकनगर आगीप्रकरणी रिलायन्स रिअल्टर्सच्या भागीदारांविरोधात गुन्हा