लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमधील आग लागलेल्या वन-अबोव्ह या पबचे मालक ऱ्हतेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानका हे अद्याप फरार असून पोलिस त्यांच्या मागावर आहेत. हे तिघेही भायखळ्याला राहणारे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २५ जणांचे जबाब नोंदवल्याची माहिती ना. म. जोशी. मार्ग पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक अहमद पठाण यांनी दिली.
तर, हे तिघे परदेशात पळ काढू नये यासाठी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी तिघांच्या नावाने लूक आऊट नोटीस जारी केली असून वांद्रे येथील पासपोर्ट विभागाला तशी कल्पना देण्यात आलेली आहे. शिवाय घटना समजून घेण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत असून डिव्हीआर शोध घेतला जात आहे.
कमला मिल कंपाऊंडच्या ट्रेड हाऊसमध्ये साधारणत: वर्षापूर्वी वन-अबोव्ह हा पब सुरू झाला होता. इमारतीच्या टेरेसवर असलेल्या पबच्या शेजारीच मोजेस रेस्टाॅरंट सुरू करण्यात आलं होतं. या पबला गुरूवारी रात्री १२.१८ च्या सुमारास आग लागली. पबमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने त्याठिकाणी असलेल्या मद्याच्या साठ्याने आग भडकली.
आगीच्या धूरात पबमधील कर्मचारी आणि मॅनेजर यांनी इतरांना मदत करण्याऐवजी स्वतः च घटनास्थळाहून पळ काढला. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाल्याचं कळाल्यानंतर पोलिसांनी पब मालकांचा शोध घेण्यास सुरूवात केली. मात्र संबधितांचे फोन रात्रीपासूनच बंद लागत होते. पोलिस तपासात वन-अबोव्ह या पबचे मालक ऱ्हतेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानका यांची नावे पुढे आल्यानंतर कलम ३०४, ३३७, ३३८ आणि ३४ अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला.
CCTV footage of people escaping from #KamalaMillsCompound where a massive fire claimed 14 lives @RidlrMUM #KamalaMillsFire #KamalaMills #Mumbai #India pic.twitter.com/J9SCWqqGsT
— Mumbai Live (@MumbaiLiveNews) December 29, 2017
त्यानंतर पोलिसांची तीन पथके पबच्या मालकांचा शोध घेत होते. मात्र त्यांच्याबाबत कोणतिही ठोस माहिती पोलिसांना मिळत नव्हती. त्यावेळी खबरदारी म्हणून पोलिसांनी या तिन्ही आरोपींबाबत लूक आऊट नोटीस जारी करत त्याची माहिती वांद्रे येथील मुख्यपासपोर्ट विभागाला पाठवली. तर या तिन्ही आरोपींचे मोबाईल लोकेशन काढून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा-
कमला मिल आग: महापालिकेच्या ५ अधिकाऱ्यांचं निलंबन
वाढदिवस ठरला 'खुशबूचा' मृत्यूदिवस!