विजय मल्ल्याची फ्रान्समधील १४ कोटींची मालमत्ता जप्त


विजय मल्ल्याची फ्रान्समधील १४ कोटींची मालमत्ता जप्त
SHARES

सक्तवसुली संचलनालयाच्या(ईडी) तक्रारीनंतर फ्रान्समधील स्थानिक प्रशासनाने विजय माल्या याच्या मालकीची ३२ अवेन्यू फोच येथील मालमत्ता जप्त केली. जप्त करण्यात आलेली मालमत्ता १.६ मिलीयन युरो(सुमारे १४ कोटी रुपये) किंमतीची आहे. मे. किंगफिशर एअरलाईन्स लि. च्या खात्यावरून कोट्यावधींची मालमत्ता परदेशी गेल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले होते.

हेही वाचा- कोरोना काळात केलेल्या कामगिरीबद्दल बेस्टचा 'या' ऑर्गनायझेशनकडून गौरव

 विजय मल्ल्या २ मार्च,२०१६ ला लंडनला गेला होता. किंगफिशरने बॅंकांकडून घेतलेल्या ९ हजार कोटींच्या कर्जाची परतफेड न करता मल्ल्या लंडनमध्ये राहात आहे.अनेकदा न्यायालयाने मल्ल्याला अटक वॉरंट बजावले. याप्रकरणी सीबीआयनंतर ईडीनेही गेल्यावर्षी गुन्हा दाखल केला होता. भारत आणि ब्रिटनमध्ये १९९२ मध्ये गुन्हेगार हस्तांतरण करार झाला आहे. या करारानुसार आर्थिक गुह्यातील आरोपी म्हणून विजय मल्ल्याला ताब्यात द्यावे, अशी मागणी भारताने ब्रिटन सरकारकडे केली होती. त्यानुसार माल्याला स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर सीबीआयने याप्रकरणी ११ जणांवर आरोपपत्र दाखल केले होते. भ्रष्टाचारविरोधी कायद्या अंतर्गत हे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ईडीनेही माल्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर ५ जानेवारी २०१९मध्ये माल्याला फरारी आर्थिक गुन्हेगार जाहीर करण्यात आले होते. त्याच्या प्रत्यर्पणासाठी सध्या सीबीआय व ईडी दोनही यंत्रणा प्रयत्न करत आहेत

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा